संपूर्ण राज्यभर ९० हजार बुथ आहेत. त्या ९० हजार बुथवर ९० हजार लोक आले आहेत. भाजपाचं काम गडबडच आहे, साधं नाही. त्यामुळे ऑक्सिजन कमी झालाय. सगळे बघायला आलेत राज्यात काय चाललंय? सगळे कव्हर करतायत, रेकॉर्ड करताहेत,असे प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे यांनी काढले.
राज्याभराती विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून केंद्रातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. भाजपाचे अनेक नेते स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्यभर फिरत आहेत. प्रत्येक बुथवर पोहोचता येतील, इतके नेते भाजपने महाराष्ट्रातील विविध भागात पाठवले आहेत, असं पंकजा मुंडे
मुंडे पुढे म्हणाल्या, महायुतीची सत्ता आणण्याकरता आपल्या लेकीने योगदान दिलं आहे. हे आपल्याला सांगायचं नाही का? त्यामुळे एकएक आमदार तिथे हात वर करायला हवा. त्यामुळे आपल्याला आमदार द्यावंच लागतंय.२० तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरचं बटण दाबा आणि मोनिकाताईंना विजयी करा”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी आज केलं.