ह्रदयद्रावक घटना | गरिबी आणि अंधश्रद्धेचा बळी,मुलीचं ह्रदय भाजून खाल्लं

0
142

गरिबी माणसाला कोणत्या थराला घेऊन जाते याचे भयानक वास्तव घटना समोर आली आहे.तिथे जन्मदात्या आईची मायाही कामी येत नाही,अशी हृदय पिळवटून टाकणारा एक घडला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आईनं भोंदूबाबाच्या भूलथापाना बळी पडत लेकीचा जीव दिला आहे.इतकंच नाही तर निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी नृत्यही केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला सल्ला देणाऱ्या मांत्रिकाचा पोलीस शोध सुरू आहे.

एकीकडे भारताची जगातील विकसित देश म्हणून गणना होत असताना,दुसरीकडे गरिबीच्या गर्तेत अडकलेले नागरिक नको त्या गोष्टींना बळी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. झारखंडमधल्या पलामू इथं एका महिलेनं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीचा बळी दिलाय. मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला अंधश्रद्धेला बळी पडली आणि तिने मुलीला मारून तिचं हृदय शिजवून खाल्लं तसंच प्रसाद म्हणून मांत्रिकालाही दिलं.हा अघोरी समोर आला इसून आईला ‌पोलीसांनी ताब्यात घेतले असून मांत्रिकाचा शोध सुरू आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here