गुन्हेगारावर अवघे २५ पैशांचे बक्षीस

0
70

इतिहास लिहिणाऱ्यांना किंवा कुख्यात गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस अनेकदा हजारो-लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर करतात. वॉन्टेड गुन्हेगारावर २५ पैशांचे बक्षीस असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? हे थोडे विचित्र वाटत असले तरी वास्तव आहे. भरतपूर येथे वॉन्टेड गुन्हेगार खुबीरामवर २५ पैशांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गुन्हेगारासाठी जाहीर केलेले हे बक्षीस चर्चेचा विषय ठरत आहे.

बहुधा पहिल्यांदाच एखाद्या गुन्हेगारावर असे बक्षीस जाहीर झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मृदुल कछावा यांनी सांगितले की, लखनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील गाव मई येथील रहिवासी ४८ वर्षीय खुबीराम जाट याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, शिवीगाळ, एससी-एसटी अँक्ट (अँट्रोसिटी) आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारावर दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांपैकी यावर्षी एक गुन्हा दाखल झाला.

स्वस्तात दहशत संपविण्याचे कौतुक

पोलिस मुख्यालयाची संमती घेतल्यानंतर एसपींनी खुबीराम जाट याच्यावर बक्षीस जाहीर केले. बक्षीस जाहीर झाल्यानंतर हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी जाहीर केलेल्या बक्षीसाबद्दल मात्र अधिकारी फारसे काही बोलायला तयार नाहीत. तर दुसरीकडे लोकांकडून पोलिस खात्याच्या या पावलाचे कौतुक होत आहे. अशा लोकांना बाहुबली म्हणण्याऐवजी त्यांना स्वस्तात गुन्हेगार ठरवून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा आणि दहशत संपवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे, असे त्यांचे मत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here