जत अथणी रस्त्यावरील येळदरी गावानजीक असलेल्या श्रावणी हॉटेल जवळ जीप ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला.
शांताराम बाळाराम कलाल (वय ६९ रा. संभाजी चौक, जत) व रावसाहेब बापूसो शिंदे (वय ६८) (दोघे रा. वाघोली ता. कवठेमहाकाळ) अशी त्यांची नावे आहेत. अपघातात एक जण जखमी झाले.
गणेश चंद्रकांत संकपाळ (वय ४२ रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यास पुढील उपचारासाठी मिरज येथे शासकीय येथे हलविण्यात आले आहे.