अल्पवयीन चार मुलांकडून एका मुलाचे लैंगिक शोषण

0
321

तालुक्यातील एका आश्रमशाळेतील इयत्ता दहावीतील एका अल्पवयीन (वय दहा) मुलाचे लैंगिक शोषण करून त्याला मारहाण करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी याच आश्रमशाळेतील चार अल्पवयीन मुलांवर येथील पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत येथील पोलिसांनी सांगितले की, सप्टेंबर २०२४ मध्ये तालुक्यातील एका आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलास त्याच्याच वर्गातील चार अल्पवयीन मुलांनी एका वर्गात नेहून त्याचे लैंगिक शोषण केले.

त्याला मारहाण करून ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. असाच प्रकार त्या मुलांनी सलग दुसऱ्या दिवशी त्याच मुलाशी केला. त्यानंतर लैंगिक शोषण झालेल्या मुलाने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यावर तिला प्रचंड धक्का बसला. त्यानंतर तिने बुधवारी (दि. १३ नोव्हेंबर ) येथील पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी सदर चार अल्पवयीन मुलांवर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती कोरेगाव पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी दिली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here