‘ऑडिओ क्लिप’वरुन गोंधळ,निवडणूक आयोगाकडे तक्रार

0
136

मतदारसंघात सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील उमेदवारांच्या क्रमांकावरून चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप नेमकं कोण व्हायरल करत आहे, याचा शोध पोलिस व निवडणूक आयोगाने घ्यावा,’ अशी मागणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याचे पत्रकाराशी बोलताना त्यांनी सांगितले.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर क्रमांक एकवर आ. महेश शिंदे उमेदवार आहेत, तर क्रमांक दोनवर आ. शशिकांत शिंदे उमेदवार आहेत. मात्र, या संदर्भात चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप मतदारसंघात व्हायरल झाली असून त्यामध्ये एक नंबरला मत दिले की शशिकांत शिंदेंना जाईल, असे म्हटले आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे, अशी माहिती महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे 

लेखी स्वरूपात तक्रार आजच दाखल केला आहे. विरोधकांना निवडणूक अवघड वाटू लागली आहे. कारण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

– शशिकांत शिंदे, आमदार

पोलिस दबावाखाली, तक्रार करुनही दुर्लक्ष

पोलिस यंत्रणा पूर्णपणे दबावाखाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार करूनही ते लक्ष देत नाहीत. कोणत्या हॉटेलवर कुठले गुंड उतरले आहेत, कोण ऑडिओ क्लिप व्हायरल करत आहे, याबाबत पोलिसांनी माहिती घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, पोलिस यंत्रणा त्याकडे लक्ष देत नसल्याची खंत आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here