शिंगणापूरचे जवान आण्णाप्पा हजारे अंनतात विलीन

0जत,संकेत टाइम्स : शिंगणापूर ता.जत येथील जवान आण्णाप्पा विठू हजारे (वय 41)यांच्यावर शासकीय इतममात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आण्णाप्पा हजारे हे जम्मू काश्मीर येथे सैन्य दलात कार्यरत होते.गेले काही दिवस ते रजेवर शिंगणापूर येथे होते.काही दिवसापुर्वी ते आजारी पडले होते.त्यांच्यावर पुणे येथील सैन्याच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.


उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांना पुणे येथे‌ सैन्य दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.सांयकाळी त्यांचे पार्थिव शिंगणापूर या त्यांच्या मुळ गावी आणण्यात आले.तेथे गावकरी व नातेवाईकांना दर्शनासाठी काही काळ पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
Rate Cardयावेळी नायब तहसीलदार माळी,पो.नि.कोळी,सैन्य दलाचे अधिकारी,कॉंग्रेस नेते राम पाटील,

संरपच आण्णासाहेब पांढरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.