नवरा- नवरीसह ७ जण ठार,लग्न आटोपून घरी ‌येताना घडली घटना

0
1182

लग्न आटोपून घरी येताना भिषण अपघात घडला आहे.उत्तरप्रदेशच्या बिजनौरमधून एक भीषण अपघात झाला असून यामध्ये नववधु- वरासह सात जणांचा अंत झाला आहे. लग्न आटोपून येताना ही काळीज पिळवटून टाकणारी घडली.नुकतीच उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये इनोव्हा कार आणि कंटेनरच्या भिषण अपघातात तीन तरुण आणि तीन तरुणींचा दुर्दैवी अंत झाला.ही घटना ताजी असतानाच आता ही दुर्देवी घटना घडली आहे. 

या अपघातात वधू-वरांसह सात जणांचा मृत्यू झाला.धामापूर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली.लग्नसोहळा संपल्यानंतर नवरदेवाचे वराड वधूसोबत घरी परतत असताना ही भीषण घटना घडली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिजनौर रस्ता अपघाताची दखल घेतली.

मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हे कुटुंब रिक्षाने जात असतानाच एका भरधाव क्रेटा कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वर आणि कुटुंबातील सहा सदस्यांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.


झारखंडमध्ये लग्न आटोपून सर्व कुंटुबिय रिक्षाने बिजनौर येथील आपल्या घरी परतत होते.यावेळी हा अपघात ‌झाला आहे.या दुर्देवी घटनेने लग्नघरात शोककळा पसरली.उपचारादरम्यान टेम्पो चालकाचाही मृत्यू झाला. कुटुंबातील अन्य चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here