गर्दीत कशाला राहायचं भाऊ? ऑनलाइन तिकीट काढ

0
120

एसटीच्या प्रवाशांसाठी ऑनलाइन सुविधा

राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या प्रवाशांसाठी विविध अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, आरक्षित तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. तिकीट काढून झाल्यानंतर एसटीत जागा पकडण्यासाठी गर्दीतूनच वाट काढावी लागतात. त्यावर महामंडळाने ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वीकेंडला किंवा वीकेंडला जोडून सुट्टी आल्यास अनेकजण गावाकडे येतात. सुट्टी संपल्यानंतर नोकरी/कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे महत्त्वाचे असते.

ऐनवेळी आरक्षण उपलब्ध होत नाही. गर्दीत उभ्याने प्रवास करणेही शक्य नसते. अशावेळी ऑनलाइन आरक्षण असेल तर प्रवास सुखकर होतो.मुंबई, पुण्यातील प्रवाशांना कुठूनही तिकीट काढता येते. गर्दीतून कुटुंबासह प्रवास करताना प्रचंड हाल होतात. जागा पकडण्यावरून ‘तू तू, मैं मै’ होते. एकाला एकीकडे तर सोबतच्याला दुसरीकडे सीट मिळते. सोबत लहान मुले असतील तर प्रवास निराशाजनक होतो.त्यामुळे ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा पर्याय उत्तम ठरत आहे. बहुतांश प्रवासी लांब पल्ल्यासाठी ऑनलाइन तिकीटच काढत आहेत.

तिकीट खिडकीचाही वापर मोबाइल किंवा संगणकावरून ऑनलाइन तिकीट काढणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक आगारातील बसस्थानकात तिकीट आरक्षणासाठी स्वतंत्र खिडकी सुरू आहे. सणासुदीच्या दिवसात, गर्दीच्या हंगामातील तिकीट प्रवाशांना काढता येते. त्यामुळे तिकिटासाठी रांगेत जास्त काळ उभे राहण्याची गरज नाही.

एकदाच आरक्षण महामंडळाकडून महत्त्वाच्या मार्गावर ऑनलाइन आरक्षणासाठी आधीच गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे मुंबई, पुण्यातून सुट्टीला येणारा प्रवासी एकाचवेळी येण्या- जाण्याचे तिकीट काढू शकतो. ऑनलाइन आरक्षणामुळे प्रवाशांना कुठूनही कुठल्याही मार्गावरील एसटीचे आरक्षण करणे सुलभ झाले आहे. महामंडळाने प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता यावे, यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध केली आहे. नोकरी, शिक्षणासाठी मुंबई-पुण्यासह अन्य शहरांत राहणाऱ्यांसाठी ही सुविधा फायदेशीर आहे. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here