शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक यांचा २२ हजार ६२४ मतांनी पराभव केला. वाळवा तालुक्यातील ४८ गावांतही भाजपला ६८४० मतांची आघाडी मिळाली आहे.
यामुळे जयंत पाटील गटास धक्का बसला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत सत्यजित देशमुख यांची रॅली काढण्यात आली.शनिवारी सकाळी आठ वाजता गोरक्षनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी सुरू झाली. पहिल्या व दुसऱ्या फेरीत मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली होती. तर तिसऱ्या फेरीत आघाडी कमी होऊन सत्यजित देशमुख यांनी आघाडी घेतली ती अखेरपर्यंत कायम होती.