आटपाडीच्या भूमिपुत्राचा जत तालुक्याच्या‌ मतदारांनी दिली साथ

0
10

आटपाडी : आटपाडी तालुक्याचे भूमिपुत्र विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये जात आपल्या कामाचा डंका गोपीचंद पडळकर वाजवला असून, काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा पराभव केला. अनेक वर्षांच्या संघर्षमय राजकीय वाटचालीतून प्रथमच त्यांना थेट विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोषी मिरवणूक काढत आनंद साजरा केला.

आटपाडी तालुक्याचे असूनही जतसारख्या विस्ताराने मोठ्या असणाऱ्या मतदारसंघात जनतेपर्यंत पोहोचणे व तेथील जनतेला विकासाची खात्री देत त्यांनी अपेक्षित यश मिळविले आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आटपाडी तालुक्यातून करत असताना जिल्हा परिषद ते विधानसभा व लोकसभा अशा निवडणुका लढविल्या. मात्र त्यांना अपयश येत गेले.

२०१९ मध्ये वंचितमधून सांगली लोकसभा निवडणूक लढवत तीन लाखांहून अधिक मते घेतली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत बारामतीमधून निवडणूक लढविली. त्यानंतर भाजप पक्षाने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी देत आमदार केले होते. मात्र जनतेमधून निवडून येण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी मोठा राजकीय संघर्ष केला. सांगली जिल्ह्यासह राज्यातील विरोधकांनी अनेक राजकीय षडयंत्र रचले होते. अनेकवेळा त्याच्यावर हल्ले केले. मात्र त्यांनी संपूर्ण राज्यात धनगर समाज एकविटण्यासाठी प्रयत्न केले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा, एसटी कर्मचारी यांच्यासाठी उभारण्यात आलेला लढा, याचबरोबर वंचित, शोषित व अठरापगड जातीच्या साठी महामंडळ स्थापन करण्यासाठी विधान परिषदेत केलेले प्रयत्न याबाबत जनतेने प्रेम दिले. एकंदरीत आटपाडीचे असूनही त्यांनी जत मतदारसंघात आपले प्राबल्य सिध्द केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here