डफळापूर : डफळापूर ता.जत येथून मला चांगले मताधिक्य मिळाले असून यापुढे डफळापूरचा विकास करण्याची जबाबदारी माझी असेल,असे मत नवनियुक्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.
मोठ्या विजयानंतर त्यांनी डफळापूर येथील श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला भेट दिली.यावेळी विविध ठिकाणी त्यांचे सत्कार करण्यात आले.डफळापूर करांनी मला साथ दिली आहे.त्यामुळे डफळापूरसह या भागातील प्रंलबित कामे करण्यास माझे प्राधान्य राहिल,असेही आ.पडळकर म्हणाले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,माजी बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण,सोसायटी संचालक बाळासाहेब चव्हाण,संजय गडदे,देवदास पाटील,शहाजी जाधव, अमिर नदाफ,सज्जन हताळे,हर्षवर्धन चव्हाण,सुरज महाजन,पप्पू माने,बाळू माने आदी मान्यवर उपस्थित होते.