जतला मंत्रीपद निश्चित ! | आ.गोपीचंद पडळकर यांना आता‌ खाते कोणते मिळणार याचीच चर्चा

0
687

जत : जत मतदार संघ मोठा विजय मिळवले आमदार गोपीचंद पडळकर यांचेच मंत्रिपदासाठी सांगली जिल्ह्यातून नाव आघाडीवर आहे.त्यामुळे आमदार पडळकर यांचे मंत्रीपद निश्चित असून आता त्यांना कोणते खाते मिळते.सांगलीचे पालकमंत्री पद मिळते का?याचीच चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.येत्या पाच तारखेला राज्यात भाजप महायुतीचे सरकार स्थापन होत आहे.त्यात देश स्वतंत्र झाल्यापासून पाण्यासह मंत्रिपदाचा दुष्काळ असलेल्या जत तालुक्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ आमदार पडळकर यांच्या‌ रूपाने संपणार आहे. 

मुळ आटपाडीचे भूमीपुत्र असणारे आ.पडळकर हे राज्यात मुलुख मैदानी तोफ म्हणून प्रसिध्द आहेत.त्यांना ‌भाजपाने विधान परिषदेवर आमदार करत पक्षात‌ मोठे स्थान दिले होते.त्यांना मिळालेल्या आमदारकीला जनहितासाठी सार्थकी लावण्याचे काम गेल्या तीन वर्षात त्यांनी केले होते.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपने ‌त्यांना थेट जत विधानसभेच्या रिंगणात उतरविले होते.जिल्ह्यासह राज्यभरातील नेत्यांनी त्यांना रोकण्यासाठी ताकत लावली मात्र गोपीचंद पडळकर नावाचे जत तालुक्यात आलेले वादळ त्यांना शमविता आले नाही.या वादळात विद्यमान आमदारासह भाजपा बंडखोंरालाही मोठा दणका देत तब्बल ३८ हजारावर मताधिक्याने आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयी केले. 

अगदी सहा महिन्यापुर्वी तालुक्यात त्यांनी विधानसभेचे तयारी सुरू केली.त्या वेळेत त्यांनी जतसाठी आणलेला निधी भविष्यातील त्यांच्या विजयाचा पाया घालून दिला.लोकांनी जनतेचा तरूण,कर्तबगार,बेधडक,देधडक वृक्तृत्व असणारा आमदार जत तालुक्यातील जनतेनी निवडला.भाजपाचे नेते भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हिरा ओळखत तुम्ही माझ्या गोपीचंदला विजयी करा जतला नंबरवन बनविण्याची जबाबदारी माझी अशी साद घालत ‌जत तालुक्यात राज्यातील पहिली सभा घेतली होती.देवेंद्र फडणवीस यांच्या या आवाहनाला मोठी साथ जत तालुक्यातील जनतेनी दिली.आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.आता त्या जनतेचे उत्तरदायित्व पुर्ण करण्याची जबाबदारी भाजप नेतृत्वाकडे आहे.जत तालुक्यात येत्या पाच वर्षात तूफान विकास होईलच पण जतच्या भोंड्या रानामाळातून लाल दिव्याचा गजरही होणार हे जवळपास निश्चित झाला आहे.

सांगली जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी एकच नाव 

राज्यात सरकार स्थापन करण्याची तयारी जोरात सुरू आहे.संभाव्य‌ मंत्री पदाच्या‌ आमदारांची नावेही समोर येत आहेत.सांगली जिल्ह्यातून भाजपचा गड ‌पुन्हा खेचून आणण्याची किमया केलेले जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे एकच नाव सध्या भाजपाकडून संभाव्य मंत्रीपदासाठी समोर येत आहे.त्यामुळे जतचा पाण्यासह मंत्री पदाचाही दुष्काळ हटणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here