जत : उमा चॅरिटेबल ट्रस्ट, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स, जत येथे जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यंदाच्या जागतिक एड्स दिनाची संकल्पना होती,योग्य मार्ग निवडा: माझे आरोग्य, माझा हक्क (Take the Right Path: My Health, My Right). कार्यक्रमाचा मुख्य उद्देश एड्स संदर्भातील जागरूकता निर्माण करणे,योग्य आरोग्य निर्णयांची गरज पटवून देणे आणि आरोग्याच्या मूलभूत हक्कांची जाणीव समाजात रुजवणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात जत शहरात आयोजित भव्य रॅलीने झाली.या रॅलीत इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी, शिक्षकवृंद, आणि आरोग्य सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.रॅली रॅली दरम्यान,एड्सविषयी जागरूकता पसरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभावी पोस्टर, बॅनर आणि घोषवाक्यांचा वापर केला.विद्यार्थ्यांनी एड्ससंबंधी जनजागृतीसाठी प्रभावी तीन नाटिका सादर केल्या.
नाटकाद्वारे एचआयव्ही/एड्सचा प्रसार कसा होतो, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, तसेच एड्ससंबंधी असलेल्या गैरसमजांविषयी माहिती देण्यात आली.सुरक्षित वर्तन, वेळोवेळी तपासणीचे महत्त्व, आणि योग्य उपचार पद्धती या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला.प्राचार्य डॉ.माळी बी.एस., डॉ स्मिता विभुते,विद्याधर कीट्टद उपस्थित होते.