चालू हंगामातील १ लाख एकवीस हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन
डफळापूर : येथील श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि, डफळापूर-कुडनूर कारखान्याच्या २०२४-२५ गाळप हंगामातील १२१००० व्या साखर पोती पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र आप्पा लाड व मान्यवरांच्या हस्ते झाला. चालू हंगामासाठी कारखान्याने साडे चार लाख टनाचे उदिष्ट ठेवले असून यावेळी भारती शुगर्स चे चेअरमन ऋषिकेश लाड उपस्थित होते.
यावेळी महेंद्र आप्पा लाड यांनी यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने साडे चार लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहे. यावर्षी गळीतास येणाऱ्या उसाला प्रती टन अर्धा किलो प्रमाणे सवलतीच्या दारात साखर देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतची बिले अदा केली असून ऊस उत्पादकांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा व ज्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून पूर्तता करावी व शेतकऱ्यांनी आपला ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे व गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहन श्री लाड यांनी केले .
यावेळी जनरल मॅनेजर श्री.महेश जोशी, शेती अधिकारी सतीश मिरजकर, चिफ इंजिनिअर श्री यशवंत जाधव, चिफ केमिस्ट श्री दिपक वाणी, इलेक्ट्रीकल इंजिनिअर श्री आनंदा कदम यांचे सह सर्व अधिकारी उपस्थित होते.
एकरकमी ३ हजार देणार
श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि, डफळापूर-कुडनूर यावर्षी एकरकमी रु.३०००/- दर देणार असल्याचे चेअरमन आमदार.डॉ.विश्वजीत कदम यांनी जाहीर केले. तसेच जत व कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकास व उन्नतीमध्ये श्रीपती शुगर नेहमीच बरोबर राहील.
श्रीपती शुगरच्या १,२१,००० व्या पोत्याचे पुजन करण्यात आले.