सांगली : सांगली शहरातील दुकान फोडून ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही कर्नाटकातील असून त्यांच्याकडून चोरलेली रोकड, दुचाकी असा ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सुहेल ए. जे. लियाकत अली (वय २५), एस. डी. इरफान अली एस. दस्तगीर (वय २१), बी. के. मोहमद तय्यब रेहमानवली (वय २१, सर्व रा. होस्पेट, जि. बेल्लारी) अशी अटक केलल्यांची नावे आहेत. शहरातील गणपती पेठ येथील एक दुकान फोडून रोकड तसेच अन्य साहित्य लंपास करण्यात आले होते. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकातील विक्रम खोत यांना तानंग फाटा येथे तिघेजण एका दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, महादेव नागणे, सागर लवटे, संदीप गुरव, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, उदय माळी, संदीप नलवडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं आहे. चोस्ट्याने एटीएम फोडून तब्बल 18 लाख 77 हजार 300 रुपयांची रोकड पळवली आहे. एटीएमधून लाखोंची रोकड लंपास केल्यानंतर चोरट्याच्या भरधाव चारचाकीने पोलिसांनी आडवे लावलेले बौरेगेट तोडुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी थरारक पाठलाग केला. या पाठलागादरम्यान पोलीस आणि चोरट्यांच्या वाहनांना एकमेकांना जोराची धडक बसली. या धडकेनंतर चोरटे कार सोडून पैसे घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारिख ४ जानेवारी,स्थंळ डायल ११२ कंट्रोल रूम…वेळ : सकाळी ११.३०… फोन खणखणला…‘सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे, पोलिस मदत हवी आहे’ असे समोरून सांगितल्यानंतर फोन कट…मग पोलिसांची धावपळ सुरू…पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे बॉम्बशोधक पथकाची तपासणी…अखेर खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मालगाव (ता. मिरज) येथील यमनाप्पा मरगप्पा माडर (वय ५०, रा. तवटे मळा) या तळीरामास ताब्यात घेतले.
शनिवारी सकाळी ११.३० वाजता डायल ११२ वर कॉल आल्यानंतर फोन करणाऱ्याने ‘सांगली पोलिस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला, पोलिस मदत हवी आहे’ अशी अर्धवट माहिती देत फोन कट केला. हा कॉल शहर पोलिस ठाण्याकडे डायल ११२ वर कार्यरत पोलिस कर्मचारी वसिम मुलाणी यांना ट्रान्सफर झाला.
येथील गणेश कॉलनीतील ऍड. सुखदेव कोरटे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. कटावणीच्या सहाय्याने दार उघडून घरातील 40 हजार रुपयांची रोकड व अन्य सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बहे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत बहे-नरसिंहपूर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात निघालेली दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील आई आणि ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी झाला.
काजल चेतनसिंग हजारे (वय २८) आणि देवांश चेतनसिंग हजारे (वय ५, दोघे रा. कब्बुर, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर दुचाकी चालवणारे चेतनसिंग विठ्ठलसिंग हजारे (वय ३२) हे जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत अनंत रामसिंग रजपूत (रा. इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतनसिंग हजारे याच्याविरूद्ध पत्नी आणि मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव आणि हॉटेल शिलेदार फोडून साहित्य चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छडा लावला.संशयित समशुद्दीन महंमद इलियास खान (वय २७, रा. मोमीननगर, पेठवडगाव), महंमद इम्रान अकबर अली (वय २४, रा. पेठवडगाव, मूळ रा. मैना, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), फर्याद आलम महंमद इलियास खान (वय २३, रा. पिपरा पठाण, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मालवाहतूक टेम्पो व हॉटेलमधून चोरलेले साहित्य असा ३ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.