डफळापूरमध्ये इन्सान,रिलायन्स ग्रुपकडून गरजू नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप

0
8





डफळापूर, संकेत टाइम्स : इन्सान फाउंडेशन व रिलायन्स ग्रुपच्या वतीने डफळापूर ता.जत येथील गरीब, गरजू नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.





पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.कोरोना काळात अडचणीत असलेल्या नागरिकांना सामाजिक बांधिलकी जपत इन्सान फाउंडेशन व रिलायन्स ग्रुपच्या वतीने राज्यभर किराणा साहित्याचे वाटप करत मदतीचा हात दिला आहे.

फांऊडेशनचे सतिश भोसले यांनी यांचे नियोजन केले.





दिग्विजय चव्हाण म्हणाले,इन्सान फाउंडेशन व रिलायन्स ग्रुप अशा सामाजिक संस्थांनी दिलेली मदत आमच्या भागातील गरजू नागरिकां मोठी मदत आहे.सध्या ग्रामीण भागातील अनेक कुंटुंबे मोठ्या अडचणीत आहेत.त्यांना अशा समाजसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.






यावेळी बाजार समिती माजी संचालक विलास माने, सोसायटीचे चेअरमन मनोहर भोसले,संचालक राजकुमार भोसले, ग्रा.प.सदस्य देवदास चव्हाण,कॉ.हणमंत कोळी,वसंत कोळी,भाऊसाहेब माने, धनाजी चव्हाण,साहेबराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


इन्सान फाउंडेशन व रिलायन्स ग्रुपकडून गरजू नागरिकांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here