धक्कादायक | दोन चिमुकल्यासह आईने मारली विहिरीत उडी | दोन्ही चिमुकल्यांचा मुत्यू | आईला वाचविण्यात यश | जत तालुक्यातील खैराव येथील घटना
जत,संकेत टाइम्स : खैराव ता.जत येथील विवाहितेने दोन मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यात सुप्रिया शंकर बुरूगंले (वय 4),समर्थ शंकर बुरूगंले (वय 9)यांचा बुडून मुत्यू झाला.तर विवाहिता रूपाली शंकर बुरुंगले (वय 35)हि मोटारीच्या दोरीला धरून लटकत राहिल्याने पोलीस व गावातील नागरिकांना तिला वाचविले.
याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,मुळ लोणार पडळकरवाडी ता.मंगळवेढा येथील शंकर बुरुगंले यांची खैराव येथे शेतजमिन आहे.तेथे ते कुंटुबियासह राहतात.त्यांचा व पत्नी रूपाली हिचा दुसरा विवाह झालेला आहे.या दोघांना समर्थ व सुप्रिया अशी दोन मुले आहेत.घरातील किरकोळ वादातून रूपाली हिने घराजवळ असणाऱ्या स्व:ताच्या विहिरीत दोन मुलासह उडी मारली,त्यात दोन्ही मुले हातातून निसटल्याने त्यांचा मुत्यू झाला.तर रुपालीने मोटारीच्या पाईपला बांधलेल्या दोरीला धरून राहिल्याने ती वाचली.दुर्देवाने आईच्या रागापोटी निष्पाप दोन मुलांना जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान रूपाली हिने विहिरीत उडी मारल्यानंतर पोलीस पाटील कांताबाई पाटील यांनी जत पोलीसांना कळविले,सा.पो.नि.घोडके,उपनिरिक्षक गोपाल भोसले, हवलदार संजय माने,पोलीस कर्मचारी समिर मुल्ला,श्रीमती मुजावर,श्रीमती गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.तोपर्यत रूपाली मोटारीच्या दोरीला धरून उभी होती.पोलीस व स्थानिकांनी तिला सुखरूप बाहेर काढले.बुडालेल्या मुलांनाही विहिरी बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
