सांगली : सांगली जिल्ह्यातील दैनिक संकेत टाइम्स या दैनिकांच्या दशकपुर्ती वर्षानिमित्त प्रकाशिक करण्यात आलेल्या संकेत टाइम्स दिनदर्शिकेचे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले.
प्रथम वाचकांच्या हस्ते प्रकाशन करून ही दिनदर्शिका सर्वत्र मोफत वितरित करण्यात येत आहे.जतसारख्या दुष्काळी भागात सन २०१५ ला दैनिक संकेत टाइम्सचा जन्म झाला.वृत्तमान पत्र विक्रेते असलेले राजू माळी यांनी या दैनिकांची मुहूर्त मेढ रोवली आहे.
गेल्या दहा वर्षात जनसामान्या वरील अन्यायाविरोधात आवाज उठवत असताना आलेल्या संघर्ष काळ पचवून दैनिक संकेत टाइम्स वाचकांच्या सेवेत सज्ज कायम राहिला आहे.आपल्या १० वर्षाच्या काळात अनेक संकटे संकेत टाइम्स ने पचविली आहे.
यंदाचे वर्ष हे दशकपुर्ती वर्ष असल्याने व्यवस्थापनाकडून ही दिनदर्शिका काढण्यात आली आहे.काही मोजक्या व्यवसायिकांच्या जाहिरातीही यामध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत.दिनदर्शिकेला सर्वच ठिकाणाकडून मागणी येत आहे.
भविष्यात संकेत टाइम्स मिडिया कंपनीच्या माध्यमातून दैनिक संकेत टाइम्स नव्या रूपात वाचकांच्या सेवेत असणार आहे.आतापर्यत सर्वाचेच सहकार्य मिळाले आहे,असे कायम रहावे,असे आवाहनही व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.