जत पालिकेला जनरल चॅम्पियन ट्रॉफी

0
38

जत : नगर विकास विभागातर्फे विटा येथे क्रीडा स्पर्धा व तासगाव येथे सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जत नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मुख्य जनरल चॅम्पियन ट्रॉफीसह तब्बल २१ पदके मिळवली.

यश मिळवलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत थाळीफेक, भालाफेक, १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, वैयक्तिक नृत्य, कविता वाचन, २०० मीटर धावणे, ३ किलोमीटर चालणे, उंच उडी, लांब उडी, बॅडमिंटन, बॅडमिंटन दुहेरी या खेळांचा समावेश आहे. जत नगरपालिकेने जिल्ह्यात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याने ती जनरल चॅम्पियन ट्रॉफीची मानकरी बनली आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपालिका व त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. चॅम्पियन ट्रॉफीवर जत नगर परिषदेचे नाव कोरले. तसेच व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतापद पटकाविले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here