मिरज : सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला वैभवाच्या शिखरावर नेले. राज्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार व सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. तो वारसा पृथ्वीराज पाटील समर्थपणे चालवत आहेत, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत देशमुख यांनी केले.
गुलाबराव पाटील यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकुलाचे संस्थापक पृथ्वीराज पाटील अध्यक्षस्थानी होते. ऋतुराज पाटील यांनी स्वागत केले. संकुलाच्या वाटचालीचा आढावा घेतला. सत्यजित देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल सत्कार करण्यात आला.
सत्यजीत देशमुख म्हणाले, ‘‘पृथ्वीराज पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क बांधले आहे. जनता त्यांच्या बरोबर आहे, मात्र आता खेकडा प्रवृत्तीच्या लोकांमधून त्यांना बाहेर पडले पाहिजे. सकारात्मक उर्जेच्या राजकारणातून जनहितासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या विस्तारात आणि सांगलीच्या विकासासाठी तुम्हाला शासनाचे सहकार्य मिळवून देण्यात मी तुमच्या बरोबर आहे.’’
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘गुलाबराव पाटील यांनी ४० वर्षे जिल्हा बँक आणि सहकार क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय संस्थेत उच्च पदावर काम केले. शिवाजीराव देशमुख साहेब जसे सुसंस्कृत व विनयशील नेते आहेत तसेच माझे मित्र सत्यजित देशमुख आहेत. गुलाबराव शैक्षणिक संस्था म्हणजे गुलाबरावांचे जिवंत स्मारक आहे. होमिओपॅथी मेडिकल कॉलेजला सर्वांच्या सहकार्याने नॅकचे बी प्लस मानांकन मिळाले आहे. सांगलीसाठी मी तयार केलेला विकास आराखडा सत्यात उतरवण्यासाठी आमदार म्हणून मला त्यांनी मला मदत करावी. निवडणुका येतील अन जातील, पुन्हा जनतेचा कौल घेऊन समाजकारणासाठी आमदार होणार.’’
बाळासाहेब गुरव यांनी गुलाबराव पाटील आणि शिवाजीराव देशमुख आणि आमदार सत्यजित देशमुख व पृथ्वीराज पाटील यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांनी मानले. प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी विश्वस्त विरेंद्र पाटील वकील , बिपीन कदम, सनी धोतरे, रघुनाथ नार्वेकर, रघुनाथ घोरपडे, टी. डी. पाटील, हुल्याळकर मामा, बी. ए. पाटील, अजय देशमुख, महावीर पाटील, राजेंद्र कांबळे, अशोकसिंग रजपूत, इरफान केडिया, नितीन तावदारे, अमोल कदम, उत्तम सुर्यवंशी, आयुब निशाणदार, मौला वंटमुरे, ए. ए. काझी वकील,
महत्वाचे –
सत्यजीत देशमुख यांनी काँग्रेस पक्षाबद्दल महत्वाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, की वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या काळातील संघटन आता राहिले नाही. स्वकियांनी तुम्हाला मदत केली नाही. आता संघटनात्मक रचनेचा अभ्यास करुन पुढील वाटचाल निश्चित करा. खेकचा प्रवृत्तीच्या गर्दीतून बाहेर पडला. पृथ्वीराजबाबा तुम्ही पराभवाने खचून न जाता जनतेची कामं करत रहा. माझे संपूर्ण सहकार्य राहील. शिराळा जिंकनं एव्हरेस्ट सर करण्याएवढे अवघड होते. पण जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला याची प्रचिती नेतृत्वाने दिली.