डफळापूर : गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने जमिनीतील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे.त्यामुळे त्याचा बागायत शेतीला मोठा फटका बसत आहे.पाण्याअभावी पिके माना टाकत आहेत.बागायत शेती वाचविण्यासाठी म्हैसाळ योजनेतून जत पश्चिम भागातील सर्व तलावे,बंधाऱ्यात पाणी सोडावे,अशी मागणी सांगली बाजार समितीचे माजी संचालक अभिजीत चव्हाण यांनी केली आहे.
सध्या म्हैसाळचे आवर्तन सुरू आहे.मात्र जत तालुक्यात अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही.मागणी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.मात्र दरवर्षीप्रमाणे कँनॉल सुरू होतील या आशेवर येथील शेतकरी आहेत.सध्या पाणी अखेरीला आले आहे.त्यामुळे मागणीचा विचार न करता सरसकट पाणी पोहचतेय तेथपर्यत म्हैसाळचे पाणी सोडावे.या पाण्याशिवाय येथील शेतकरी टिकणार नाही हे वास्तव आहे.
गेल्या दोन वर्षापासून तग धरलेल्या शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचा मोठा आधार आहे.त्या पाण्याच्या जिवावर शेतीत ऊस,द्राक्ष,डाळिंब,आंबासह बागा बहरल्या आहेत.मात्र सध्या सर्वच पिकांना पाणी कमी पडत आहे.संबधित विभागाने कोणतेही कारण पुढे न करता पाणी सोडावे,असेही अभिजीत चव्हाण यांनी म्हटले आहे.