जेष्ठ नेते धान्नाप्पांना पट्टनशेट्टी समाजरत्न पुरस्कार गौरव

0
268


कवटेमंहकाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जतचे लिंगायत समाजाचे जेष्ठ नेते धान्नाप्पांना पट्टनशेट्टी यांना राष्ट्रीय लिंगायत संघांचे संस्थापक अध्यक्ष शरण प्रदीपबापू वाले यांचेकडून तासगाव कवठेमहांकाळचे आमदार युवा नेते रोहित पाटील यांच्या हस्ते लिंगायत समाजासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कवठेमहांकाळ येथे लिंगायत संघांचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपबापू वाले यांनी लिंगायत शरण संगम व वधू वर पालक असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास आमदार रोहित पाटील, अजिकुमार कोष्टी, अनिता सगरे वहिनी, गजानन कोटावळे, तुकाराम माळी, मिलिंद साखरपे, महादेव तेली, सागर महाजन, नारायण माळी, राजाराम पाटील देवानंद जमगे आदी मान्यवर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात धानपांना पट्टनशेट्टी यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.


धान्नाप्पांना पट्टनशेट्टी हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांना उत्कृष्ट कन्नड मराठी भाषा लिहता वाचता येते त्यामुळे त्यांनी वयाच्या ऐशी व्या वर्षी सुद्धा कन्नड मधील पुस्तकांचे मराठी मध्ये व मराठी पुस्तकांचे कन्नड मध्ये अनुवाद करुन पुस्तके लिहल्यामुळे लिंगायत धर्माची माहिती उपलब्ध झाली. तसेच त्यांनी लिंगायत धर्म आचरण व्यवस्थित व्हावे म्हणून काही पुस्तके स्वतः लिहून विनामूल्य वाटलेली आहेत.
धान्नाप्पांना यांचेवर लिंगानंद आप्पाजी आणि मातीजी यांचे विचाराचा प्रभाव असून त्यांच्या बसाव धर्मपीठ संस्थेचे माध्यमातून सद्गुरु बसवप्रभू स्वामीजी साह्याने बसवकल्याण ते आलमगिरी आळते अशी बसवज्योती यात्रा यशस्वी केली. आज जतचे नाव चांगले लिंगायत समाजाचे कार्य सुरु असून त्यासाठी त्यांनी तुकाराम माळी, शिवानंद आरळी यांचेसारखे अष्टपैलू कार्यकर्ते निर्माण करून त्यांना बरोबर घेऊन जत सारख्या सीमाभागात उत्कृष्ट समाज कार्य केले आहे. यावेळी विविध व्यक्त्यांनी विश्वगुरू बसवन्ना आणि लिंगायत धर्माची माहिती सांगताना म्हणाले की विश्वगुरू बसवण्णा यांच्या पेक्षा दहा वर्षानी थोरली बहिण नागाबिंका विश्वगुरू बसवण्णा यांच्या कार्यात बसवाण्णाच्या पाठिशी ठामपणे लहानपणापासून उभ्या राहिल्या.

लहान पणी बसवण्णा यांना कडेवर घेऊन फिरणे खेळविणे हे काम नागाबिंका करीत. बसवण्णा आणि नागलबिंका या भाऊ बहीण यांचे फार जिव्हाळ्याचे नाते होते.बसवण्णा अतिशय चिकित्सक होते आपल्या थोरली बहिण नागाबिंका हिला विविध प्रश्न बसवण्णा विचारत.नागबिंका हिचा विवाह बसवण्णबागेडी जवळच असलेल्या इंगळेश्वर गावीचे शिवदेव यांच्याशी झाला.पुढे नागाबिंका आणि शिवदेव यांच्यापोटी चन्नबसवण्णा यांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी बसवाचे उपनयन कार्यक्रम ठरला तेव्हा माझ्यापेक्षा मोठी बहिण नागाबिंका हिचे उपनयन होत नसेल तर माझे सुध्दा उपनयन होणार नाही म्हणून बसवण्णा यांनी समाजातील जातीभेद स्त्री-पुरुष यामधील विषमतेचे विरोधात बंड करून घरातून बाहेर पडले.

या विषमतेचे मूळ कारण वैदिक धर्मात असून या विषमतेचे मूळ कारण शोधून नष्ट करण्यासाठी त्यानी वेद पुराण शास्त्र यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर १४ जानेवारी ११५५ मकर संक्रांतीच्या दिवशी कुडलसंगम येथे त्याना इष्टलिंग अविष्कार झाला.तोच दिवस लिंगायत धर्म स्थापना दिवस होय. विश्वगुरू बसवाण्णा यांना विविध उपासना मध्ये कमालीचा विरोधाभास आणि परिपूर्णता नसल्यामुळेच इष्टलिंगाचे महत्त्व वाटले. विश्वगुरू बसवण्णा वयाच्या आठव्या वर्षापासून विसाव्या वर्षापर्यंत कुडलसंगम येथील ईशान्यगुरू यांच्या आश्रमात संगम नाथाच्या छायेत राहून विध्याभ्यास केल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे मामा बलदेव अरस यांची मुलगी गंगांबिका हिच्याशी बसवण्णा यांचा विवाह संपन्न होऊन मामा बलदेव मंगळवेढा येथील बिज्जल राज्याच्या दरबारात प्रधानमंत्री होते बसवण्णा यांना बिज्जल राज्याकडे कर्णिक पदावर सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचे सोने करून बसवण्णांनी समाजातील विषमता दूर केली एवढे मोठे काम बसवण्णा यांनी मंगळवेढा येथे करून सुध्दा त्यांच्या कार्याचा परिचय स्थानिक समाज बांधवाना पुरेशा प्रमाणात नाही तसेच बसवण्णा यांचे मंगळवेढा येथे रेवणसिध्देश्वर मंदिराशिवाय कोणतेच वास्तव्याचे पाऊलखुणणा आढळून येत नाहीत.

म्हणून देशातील विविध संघटना अहोरात्र परिश्रम घेऊन विश्वगूरू बसवण्णा यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या महान कार्य आजही समाजाला प्रेरणादायक असून ते समाजात रूजवून कल्याण राज्य निर्माण करण्यासाठी कार्य करीत आहेत. अशा प्रकारे राज्यात विविध सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवून बसव तत्वाचा प्रचार प्रसार करून बळकट समाज व्यवस्था निर्माण करत आहेत.बसव तत्व समाजात रुजविण्यासाठी लिंगानंद आप्पाजी आणि महादेवी माताजी यांनी बसव धर्मपीठ आणि राष्ट्रीय बसव दलाच्या माध्यमातून फार मोठे कार्य केले आहे.प्रवचन पितामह लिंगानंद आप्पाजी यांनी यायी फिरून गावोगावी प्रवचन देऊन समाज जागृती केली.

माताजी यांचे स्वप्न होते की लिंगायत धर्माला स्वतंत्र संवैधानिक मान्यता मिळवून देणे.त्यासाठी विविध सामाज संघटना कटिबद्ध असून त्यानुसार जोरदार काम सुरू आहे.कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात लिंगायत समाज संघटनेचे जाळे असून बसवतत्व रुजविण्यासाठी समाज संघटनानी मोठी मजल मारली आहे.


सन २०१७ सालापासून कर्नाटक, महाराष्ट्र,तेलंगणा राज्यात मोठ्या महारॅली आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामुळे त्सुनामी सारखी समाज जागृती झाली असून अजून थोडे अपूरे कार्य पुर्णत्वास नेहण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारचे काम सुरू आहे.विश्वगुरू बसवण्णा यांनी अतिशय कठीण परिस्थितीत काम करून लिंगायत धर्माची स्थापना केली परंतू देशातील विघ्नसंतोषी शक्तीनी चक्र उलटे फिरवून समाजाची दिशाभूल केली असून विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार समाजात रूजवून कल्याण राज्य निर्माण करण्यासाठी कर्नाटक राज्यातील मठसंस्था,समाजिक संघटना अहोरात्र परिश्रम घेऊन कार्य करीत आहेत. काही शक्ती याविरोधात कार्य करून विश्वगुरू बसवण्णा यांचे चांगले पवित्र विचार विद्रूप करून समाजाची दिशाभूल करीत आहेत म्हणून लिंगायत समाजबांधवांनी चिकित्सक राहून अशा शक्तीचे मनसुभे उधळून लावले पाहिजेत.

कर्नाटक राज्यातील राजकीय पक्षाचे बरीच मंडळी विश्वगुरू बसवण्णा यांचे पवित्र विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्नशील असून विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार समाजात रूजवून कल्याण राज्य निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या कार्याला सर्व प्रकारे सहकार्य करीत आहेत. भारतीय संविधान हे फक्त छापलेले पुस्तक नसून ते बुद्ध,बसवण्णा,फुले,शाहू,आंबेडकर यांचे जगातील सर्वोत्तम विचाराचे पवित्र ग्रंथ असून संविधानाचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी काही शक्ती प्रयत्नशील असून त्याचे मनसुभे केव्हाच यशस्वी होणार नाहीत.

यासाठीच विश्वगुरू बसवण्णा,महात्मा फुले,शाहू महाराज,संत गाडगे महाराज’,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षण मिळवून दिले. आज जे शिक्षण शासन व्यवस्थेकडून दिले जाते ते सामाजिक सुधारणा होण्यासाठी पुरेसे नसून विश्वगुरू बसवण्णा यांनी अनुभव मंटप स्थापन करून विविध जातीच्या शरण शरणीनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवातून चर्चा करून कन्नड भाषेत पुढील पिडीसाठी वचनसाहित्य निर्माण केले ते आजच्या पिढीला बहुमोल उपयोगी आहे.विश्वगुरू बसवण्णा यांनी ७०० शरण ७० शरणी यांना शिक्षण दिले लाखो जंगममुर्ती यांना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्याना धार्मिक शिक्षण देऊन त्याच्या समस्या दूर करून कल्याण राज्य निर्माण करण्यासाठी कार्य केले हे कार्य कल्याणक्रांतीनंतर मागे राहिले ते कार्य हंप्पीचे प्रौढराजे यांनी परत सुरू केले.

काही मटाधिशाकडून हे कार्य चांगल्याप्रकारे पुढे सुरू आहे
आज समाज हा चळवळीला कमी प्रतिसाद देतो परंतु पावर फॅक्टर कडे फार लवकर वळतो तरीसुध्दा हजारो वर्षे वैदिक सनातनी जोखडातून समाजाला बाजूला कौशल्याने आणावे लागेल. बुद्ध,बसवण्णा फुले शाहू आंबेडकर यांनी समाजातील विषमतेचे मुख्य कारण वैदिक व्यवस्था असून ती नष्ट करण्यासाठी त्यानी भरपूर कार्य केले आहे. अलीकडे शासणच धर्मा धर्मात भेदभाव निर्माण करून बुध्द, बसवण्णा, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात कार्य करून समाजाचे शोषणाला प्रोत्साहन देत आहे.


विश्वगुरू बसवण्णा यानी मोठ्या प्रमाणावर जंगम मुर्तीच्या माध्यमातून लिंगायत धर्माचा प्रसार केला. सृष्टीचा निर्माता एकच असून विविध धर्मात नावे वेगळी आहेत त्याच्या उपाषणेच्या पध्दती वेगळ्या असून ज्याप्रमाणे विविध नद्यां वेगवेगळ्या स्थानी उगम पावून शेवटी एकाच समुद्राला मिळतात तसेच धर्माचे आहे.


देशातील जनतेला धर्म म्हणजे काय धर्माची उद्दिष्ट समजून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद यांनी या क्षेत्रात फार मोठे काम केले असून त्यांच्या रामकृष्ण मिशन संस्था हे कार्य करीत असून विविध सार्वजनिक ठिकाणी त्यांची ग्रंथालय वाचकांच्या प्रतिक्षेत आहेत.. आज स्वामी विवेकानंद यांची धर्माचा फार मोठा अभ्यास होता. स्वामी विवेकानंद यांना विविध धर्माविषयी सहिष्णुता होती.

देशातील जनतेकढून धार्मिक सहिष्णुता नष्ट करण्यासाठी काही शक्ती प्रयत्नशील असून त्यांचे मनसुभे हाणून पाडणे काळाची गरज आहे हरळय्या यांचा मुलगा शिलवंत आणि मधुवरस यांची मुलगी कलावती यांना लिंगायत धर्माची दीक्षा देऊन त्यंचा विवाह झाल्यानंतर राजगुरू नारायणभट्ट आणि पंडित कोंडी मंचण्णा यांच्या आदेशानुसार धोक्यात आलेला सनातन धर्म वाचविण्यासाठी सेनापती माधव वेडापिसा होऊन शरणांची घरे जाळून त्यांच्या कतली सुरू केल्या आणि वचनसाहित्य जाळून टाकू लागले.तेव्हा शरणानानी वचनसाहित्य गोळा करून त्याचे गाठोडे बांधून गुप्त स्थळी लपवून ठेवण्यात नागालबिंका आणि त्यांचे पुत्र चन्नबसवेश्वर यांचे फार मोठे योगदान आहे.

बसवण्णा कुडलसंगमला निघून गेल्यानंतर चन्नबसवेश्वर यांनी नेतृत्व केले. नागलबिंका पती शिवदेव गंगाअंबिका हरळय्याची पत्नी कल्याणम्मा,सूर कलावती मड्डीवाळ माचीदेवर डोहर कक्कय्या किन्नरी बोम्मय्या रूद्रमनी नुलीय चंदय्या वचनसाहित्याचे गाठोडे घेऊन बिज्जल राजाच्या सैनिकांशी हातात शस्त्र घेऊन लढाई करत उळवीच्या दिशेने चालले.गुड्डापूर येथील शरणी बसवण्णा यांना भेटण्यास कल्याणला आल्या होत्या त्यांनी आणि रूद्रमुनी यांनी वचनसाहित्य उळवी येथील जंगलाच्या गुहेत लपविण्याची सल्ला दिला. मुरगोडला शरण आणि सैनिक यांच्यात घनघोर युध्दात शरणाचा विजय झाला प्रत्येक ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांनी शरणांची बाजू घेऊन त्यांना मदत केली. ज्या ठिकाणी मुक्काम असे त्या ठिकाणी चन्नबसवेश्वर इष्टलिंग पूजा करून घेत.मुरगोडच्या युध्दात लढताना मढीवाळ माचीदेवर गंभीर जखमी झाल्यानंतर ते करमनी येथे लिंगैक्य झाले.

करमणी नंतर इंचलगाव वरून तिगडी येथे हरळय्या यांची पत्नी कल्याणम्मा लिंगैक्य झाल्या. नंतर कादरोळी हुन्शीकट्टी येथे रुद्रमुनी यांची समाधी आहे.नंतर तुरमरी कुलमनट्टी तडकोड गदग मार्गे धारवाडहून हिलियाळ दांडेली हून कक्केरी कक्केरी डोहर कक्कय्या लिंगैक्य झाले. वचनसाहित्य सुरक्षित स्थळी उळवी येथील गुहेत ठेवल्यानंतर एके रात्री चन्नबसवेश्वर तापाने फणफणत वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वषी लिंगैक्य झाल्यानंतर नागलअंबिका वृध्द अवस्थेत कार्य करीत होत्या. आणि सर्वात शेवटी त्या लिंगैक्य झाल्या अशा प्रकारे नागाअंबिका यांनी विश्वगुरू बसवण्णा यांच्या कार्यात मोलाचा वाटा होता.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here