शेगाव : बेवनूर ता.जत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीमती द्वारकाई जगन्नाथ सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चुरसीने झालेल्या उपसरपंच निवडीत भाजपचे युवा नेते मारूती सरगर यांनी मातोश्री द्वारकाई सरगर यांना विजयी करण्यात यश मिळविले.स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या सदस्यांनी बंड केले होते.सरगर यांनी त्यांना सहलीला नेहले होते.
पोपटराव शिंदे,विष्णु सरगर,अर्चना कळेल,गौतम गायकवाड यांनी सरगर यांच्या बाजूने मतदान केले.यावेळी संतोष नाईक,संतोष वाघमोडे,किरण सरगर, भिमराव काळेल,तुकाराम यमगर, विजय आलदर, युवराज हाक्के,नानासो जानकर,सुभाष सरगर,मोहन आलदर, तानाजी जावेर, दत्ता कळेल, विलासराव शिंदे,अजित कळेल, विजय नाईक, राजू सरगर, दशरथ बंडगर, सखाराम आलदर, दादासो सरगर,धोंडीराम आलदर नारायण सरगर,केराप्पा सरगर, धुळा आलदर, संभाजी बंडगर,दगडू आलदर,अंकुश सरगर,भाऊसो सरगर,अण्णासाहेब, कोळेकर, संभाजी सरगर, विलास शिंदे,श्रेयश नाईक,विलास सरगर,विलास कळेल, बिरू सरगर, मंगेश नाईक,अरुण जाधव,
दादासो कोळेकर,शिवप्रसाद शिंदे,अमोल आलदर,विलास शिंदे,राजेंद्र शिंदे, रामचंद्र,प्रवीण वाघमोडे,मोहन आलदर ,दगडू सरगर,डॉ.नवनाथ सरगर,भोजलींग कळेल,अशोक सरगर, उमेश सरगर आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक श्रीमती मुल्ला मॅडम,पोलीस पाटील महादेव शिंदे यांनी काम पाहिले. सरपंच सुभाष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.निवडीनंतर माजी उपसरपंच तुकाराम नाईक,शिक्षक बँकेचे चेअरमन विनायकराव शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.विजयानंतर गुलालाची उधळन,फटक्याची आतषबाजी करण्यात आली.
बेवनूर ता.जत येथील उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल द्वारकाई जगन्नाथ सरगर यांचा सत्कार करण्यात आला.