जत : कमल ऑर्थोपेडीक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जत, येथील कमल मेडिकल अँड जनरल स्टोअर चे फार्मासिस्ट अमोल कोळी यांनी आपला 25 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
मायथळ गावातील गरीब कुटुंबात जन्मलेले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आवड असलेले त्यांनी बी.एस्सी.फार्मा शिक्षण पूर्ण करून फार्मासिस्ट नोकरी स्विकारली. गोरगरीब रुग्णांची सेवा करत सामाजिक क्षेत्रात समाजसेवा करण्याचे ध्येय समोर ठेऊन वाटचाल करीत आहेत.
त्यांनी आपल्या 25 वा वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता सिद्धार्थ पॉलीटेकनिक कॉलेज ला 25 झाडे वृक्षारोपण करण्यासाठी देऊन एक नवा आदर्श निर्माण करून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला आहे.याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.