जत : आयशर व ट्रकच्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी विजापूर-गुहागर महामार्गावरील लिंग धाब्यानजिक दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे.कर्नाटकातील महमद खादीरबादश कुमसगी व दिपक अर्जुन बडर (वय 23 वर्षे रा.पडनुर ता.इंडी जि. विजापुर) असे ठार झालेल्याची नावे आहेत
.
याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात आयशर वाहन (केए 28,डी 0629)चा चालक बसवराज मुंजानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघेही मयत कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील आहेत.आयशर वाहनाचा चालक बसवराज मुंजानी याच्या बेजबाबदार पणामुळे हा अपघात घडून दोघे ठार झाल्याची फिर्याद जत पोलीसात दाखल झाली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,संशयित बसवराज मुंजानी यांने आयशर गाडी भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने अविचाराने बेदारकपणे वाहन चालवत फिर्यादीचा भाऊ महमद यांचे ताब्यातील गाडी (केए 63,ए 3190)या वाहनास समोरुन जोराची धडक दिल्याने दोघाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. याप्रकरणी अन्वर खादारीबादशा कुमसगी यांनी फिर्याद दिली आहे.पुढील तपास सपोनि जाधव करत आहेत.