जत : गेला आठवडाभर सुरू असलेल्या तुरळक पावसाने शेताची मशागतीची कामे थांबली आहेत. शेती पिकाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वादळी वाऱ्याने हजारो झाडे उन्हमळून पडली आहेत. शेकडो विद्युत पोल कोसळले आहेत. परिणामी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे.
यामुळे तालुक्यातून महावितरणच्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. सुरुवातीला वादळी वाऱ्याने थैमान घातले. यात अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. कोळगिरी येथे पाच शेळ्या विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या आहेत. काही ठिकाणी शाळेच्या भिंती कोसळल्या आहेत.