डफळापूर : येथील श्रीपती शुगर अॅण्ड पॉवर लि, डफळापूर-कुड्नुर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५-२६ साठी ट्रक ट्रॅक्टर, अंगत व हार्वेस्टर मशीन याचे तोडणी आणि वाहतुकीचे करार करण्यास सुरवात झाली आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री महेंद्र आप्पा लाड यांनी दिली.
श्रीपती शुगर या गाळप हंगामात ५ लाख क्रशिंगचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यासाठी, २५० ट्रॅक्टर, १५० अंगत व १० हार्वेस्टर मशीनचे करार करायचे आहेत. जे ऊस वाहतूकदार वेळेत करार करतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तरी ऊस वाहतूकदारांनी कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. मागील गळीत हंगामाप्रमाणे यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालून शेतकरी व वाहतूकदार यांना न्याय देणार आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापनाने सर्व तयारी केली आहे.
श्रीपती शुगर कारखाना वेळेत बिले देनेस नेहमीच अग्रेसर असलेने शेतकऱ्यांची पहिली पसंती ठरला आहे. मागील गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी जत, कवठेमहांकाळ, सांगोला, मिरज, तासगाव, अथणी तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकरी, वाहतूक कंत्राटदार व अधिकारी-कामगारांनी बहुमोल सहकार्य केले आहे.
माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाला चांगला भाव दिला आहे, असे श्री लाड यांनी सांगितले. यावेळी भारती शुगर्सचे चेअरमन ऋषिकेश दादा लाड, जनरल मॅनेजर श्री. महेश जोशी, शेती अधिकारी सतीश मिरजकर, एच.आर. मॅनेजर श्री रणजीत जाधव, चिफ इंजिनिअर श्री यशवंत जाधव, चिफ केमिस्ट श्री दिपक वाणी, इलेक्ट्रीकल इंजिनिअर श्री आनंदा कदम यांचे सह सर्व अधिकारी व तोडणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.
महेंद्र लाड फोटो वापरा