सांगली जिल्ह्यात अकरावीसाठी तब्बल ३० हजार अर्ज | राज्यस्तरावर अशी होणार प्रवेश प्रक्रिया

0
150

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची मुदत गुरूवार दुपारी संपली. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक कनिष्ट महाविद्यालयासाठी ३० हजार ३७० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. अर्जाबाबत तक्रार असल्यास ७ व ८ मे रोजी ऑनलाइन करता येईल. तर ८ रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यंदा प्रथमच अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर केंद्रीय पध्दतीने ऑनलाइन राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात एकच संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सुरुवातीस अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे ही प्रक्रिया २५ मेपर्यंत स्थगित केली. दि. २६ मे पासून पुन्हा नोंदणी सुरु झाली आहे. दि. ५ पर्यंत मुदत होती. या मुदतीमध्ये ३० हजार ३७० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. झालेल्या नोंदणीतून दि. ६ आणि ७ रोजी हरकती दाखल करणे, हरकतीचे ऑनलाईन निराकरण होईल, हरकतींवर अंतिम निर्णयही घेतला जाईल. त्यानंतर ८ रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

शून्य फेरी अंतर्गत निवड

व्यवस्थापन कोटा, संस्था कोटा, अल्यसंख्याक कोट्यातून होणाऱ्या प्रवेशासाठी शून्य फेरी अंतर्गत शाळा व विद्यार्थ्यांची निवड होईल. दि. ९ ते ११ जून या कालावधीत विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, महाविद्यालयात जावून मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे, शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित केला जाईल.

काय करावे लागणार

११ ते १८ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना मिळालेले महाविद्यालय मान्य असल्यास तशी माहिती देणे, महाविद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रे जमा करणे, मिळालेले महाविद्यालय नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल. दि. २० रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here