सोने, ५० लाखासाठी विवाहितेचा छळ,५ जणाविरूध गुन्हा दाखल

0
26

जत : हळ्ळी (ता. जत) येथे ‘माहेरून पाच तोळे सोने, फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख रुपये घेऊन ये’, असे म्हणत, पती, सासू, सासरे व नातेवाईक असे पाच जणांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहितेने पोलिसात दिली आहे.

याप्रकरणी पती मल्लेशप्पा बसाप्पा तेली, सासू भैरवा बसाप्पा तेली, सासरे बसाप्पा गुरुसिद्धा तेली, राजश्री सिद्धाप्पा तेली (सर्व रा. हळळी) गीता शिवाप्पा देसाई (रा. हंगरंगी, ता. बबलेश्वर, जि. विजयपूर) यांच्या विरोधात उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.कांचन मल्लेशप्पा तेली (वय २९,रा.हळ्ळी, सध्या रा.उटगी, ता.जत) असे विवाहितेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, कांचन हिचा विवाह काही वर्षांपूर्वी हळ्ळी येथील मल्लेशप्पा तेली याच्याशी झाला होता. परंतु २०२२ पासून कांचनला माहेरून ५ तोळे सोने व फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख रुपये घेऊन ये असे पती, सासू, सासरे यांनी शिवीगाळ दमदाटी करत वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.

कांचन हिने उमदी पोलिसात सासरच्या मंडळीवर शारीरिक मानसिक छळ केल्या बाबत तक्रार केली आहे. त्याचबरोबर धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील गडदे करत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here