– आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून लवकरात लवकर जनतेच्या सेवेत आणावीत. तसेच कार्यान्वित करण्यात येणाऱ्या रुग्णालयामध्ये आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, रुग्णालयाच्या पूर्ण कार्यान्वयनासाठी सर्व आवश्यक व्यवस्था तत्परतेने करण्यात याव्यात, ज्यामुळे नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळू शकेल. तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची अडचण निर्माण होत असेल अशा ठिकाणी एजन्सी नेमून कंत्राटी पदभरती करण्यात यावी.