जत तालुक्यात खुलेआम अवैध धंदेलॉकडाऊनमध्येही मटका,दारू,जुगार जोमात,पोलीसच गुंतले ?
जत,संकेत टाइम्स : एकीकडे कोरोना मुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे.कोरोनाचा विस्फोट झाला आहे.त्याला रोकण्यासाठी गर्दी टाळण्याचे काम पोलीसाकडून होणे अपेक्षित असतानाही,जत पोलिस दलातील दुय्यम अधिकारी वरकमाईला सोकावले असल्याने दारू,मटका,जूगार,वाळू तस्करी सुसाट सुरू आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये या अवैध धंद्याना जत पोलीस ठाण्याच्या हप्तेरोखीसाठी लाचार अधिकारी,कर्मचाऱ्यांनी परवानगी दिल्याचे चर्चा आहे.
जत शहरासह,ग्रामीण भागात खुलेआम मटका, जुगार, घरकुल भागातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे मटका मोठ्या प्रमाणावर खुलेआम घेण्यात येत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे.बेकायदा दारू विक्रीबरोबरच गुटखा बेकायदेशीरपणे विक्री अनेक ठिकाणी होत आहे.
शहरासह,गावागावतील बेकायदेशीर मटका धंदे खुलेआमपणे सुरु असतानाही कारवाई झाल्याचे चित्र कोठेही दिसून येत नाही.संबंधित बीट अंमलदारांना,बेकायदा धंद्यांची माहिती असूनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पोलिस विभागाचे सोयीस्कर या अवैध व्यावसायाकडे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याचे चित्र आहे.जत ठाण्याचे अधिकारी,पोलिस कर्मचाऱ्यांची चेरी मेरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून, काही पोलिस अधिकारी,कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वरकमाईत गुंतलेले दिसतात.
एखाद्या महिन्याला एखाद्याची वारी चुकली, तर दुसऱ्या महिन्यात दहा हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरासह अवैध व्यवसाय जोमात सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

दुय्यम अधिकारी हप्तेखोरीला सोकावले ?

जत तालुक्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी,कर्मचाऱ्यांना इथले पाणी लागतेच, असा आतापर्यतचा अनुभव आहे.आताही तसेच झाले असून जतला नव्याने आलेले दुय्यम अधिकारी पुन्हा वरकमाईला सोकावल्याचे चित्र असून लॉकडाऊन मध्येही हे अधिकारी सावज हेरत असतात,त्यांना खालचे कर्मचारी इमानइतबारे साथ देतानाचे चित्र आहे.
लॉकडाऊन रोकण्यात अपयशी
जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे, दररोज दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे.चार-पाच रुग्णाचा मुत्यू होत आहे.त्यामुळे चैन रोकण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तालुक्यात कडक निर्बंध घातले आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीसावर असतानाही पोलीस बेपर्वार्ह दिसत असून नागरिकांचा थेट वावर कोरोना वाढवत आहे.
