शिक्षण, अनुभव आणि स्वच्छ प्रतिमेचा विजयाचा आत्मविश्वास
महाविकास आघाडीच्या पाठबळावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारीची मागणी
जत : डफळापूर पंचायत समिती गणात सध्या चर्चेचा विषय ठरलेले नाव म्हणजे अँड. इर्शाद खतीब. उच्च शिक्षित, तरुण आणि स्वच्छ प्रतिमेचे हे उमेदवार या भागातील जनतेच्या आशा-अपेक्षांचे केंद्रबिंदू बनले आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी सभापती मन्सूर खतीब यांचे पुतणे असलेले अँड. इर्शाद खतीब यांनी आपल्या सक्रिय सामाजिक कार्यातून आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून परिसरात ठसा उमटवला आहे.
जत पश्चिम भागातील डफळापूर, कुडणूर, शिंगणापूर, शेळकेवाडी, जिरग्याळ, मिरवाड आणि खलाटी या गावांचा खडानखडा परिचय असलेले खतीब या गावांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून मैदानात उतरले आहेत. या गणात उच्चशिक्षित, तरुण व अभ्यासू उमेदवारी नव्या राजकीय पिढीचा प्रतिनिधी म्हणून पाहिली जात आहे.
अँड. खतीब यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मागितली असून, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा आणि विजय मिळविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.राजकीय जाण असलेले आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेले अँड. खतीब हे निष्कलंक, चारित्र्यसंपन्न व जनतेत लोकप्रिय उमेदवार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे या गणातील निवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट
“माझे ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नाही, तर गावागावात प्रत्यक्ष विकासकामे खेचून आणणे हे आहे. सामान्य माणसाच्या विश्वासावर आणि कार्यक्षमतेवर भर देऊन मी लोकांचा विश्वास संपादन करणार आहे,”
— अँड. इर्शाद खतीब, संभाव्य उमेदवार, डफळापूर पंचायत समिती गण.




