भिलवडीतील बेकरीवर अन्न-औषध प्रशासनाची धाड

0
0

भिलवडी : भिलवडी (ता.पलूस) येथील मेन रोडलगत असलेल्या इंदिरा बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. बेकरीतील खाद्यपदार्थ, कच्चा माल आणि तयार करण्याच्या प्रक्रियेचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या पलूस तालुका प्रमुख हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाल्याचे समजते. काही नमुने पुढील तपासणीसाठी वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. तसेच काही खाद्यपदार्थ खाण्यास अयोग्य आढळल्याने ते नष्ट करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

बेकरीतील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत यापूर्वीही ग्राहकांकडून तक्रारी व नाराजी व्यक्त होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या कारवाईनंतर भिलवडीसह परिसरातील हॉटेल, चहाच्या टपऱ्या व खाद्यविक्रेत्यांमध्येही स्वच्छता आणि अन्नगुणवत्तेबाबत सतर्कता वाढल्याचे चित्र आहे.

ग्राहकांच्या तक्रारींची चर्चा

इंदिरा बेकरीतील काही खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत यापूर्वी ग्राहकांनी तक्रारी केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केल्याचे बोलले जात आहे. तपासणी अहवालानंतर कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here