जत भाजपची संघटनात्मक बैठक

0
0

जत, दि. १७ : आरळी मेडिकल कॉलेज, जत येथे भाजपा जत शहर व पश्चिम मंडलाच्या संयुक्त कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले.

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पडळकर यांनी केले. ‘आशीर्वादाचा दिवा’, रांगोळी, चित्रकला व भाषण स्पर्धा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान तसेच प्रत्येक बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

पदाधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी सक्रियपणे पार पाडावी, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामात संधी द्यावी आणि बूथनिहाय संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवून संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

यावेळी जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, जत शहर मंडल अध्यक्ष अण्णासाहेब बिसे, पश्चिम मंडल अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, मंडल पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटोओळ : जत येथील आरळी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या भाजपा जत शहर व पश्चिम मंडलाच्या संयुक्त कार्यकारिणी बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार गोपीचंद पडळकर.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here