लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता २४ सप्टेंबरनंतर?

0
6

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पात्र महिलांच्या खात्यात १,५००चा ऑगस्ट हप्ता २४ सप्टेंबरनंतर जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५००चा लाभ थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे देण्यात येतो. ऑगस्ट महिन्याचा हप्ता रखडल्याने सुमारे १ कोटी ६६ लाख लाभार्थी महिलांचे लक्ष या निधीकडे लागले आहे.

दरम्यान, हप्ता जमा होण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आणि योजनेतील आवश्यक प्रक्रिया पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लाभार्थींनी आपल्या बँक खात्याची माहिती व योजनेशी संबंधित तपशील तपासून ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here