खोजानवाडीत बसवजंयती साजरी

0
3

जत,संकेत टाइम्स : संपूर्ण  जगाला समतेचा संदेश देणारे समता नायक,अनिष्ठ चालीरिती,रुढी परंपरा यांना फाटा देत जाति व्यवस्थेवर घणाघाती प्रहार करणारे,आंतर जातीय विवाहाला प्राधान्य देवून समाजा समोर जात विरहित लिंगायत धर्म स्थापन करणारेमहात्मा,दलितोध्दारक,

स्ञीकुलोध्दारक बसवेश्वराची 888 वी जयंती खोजानवाडी बसवमंडप येथे साजरी करण्यात आली.

बसव मंडप येथे शरण शिदराया गुरूबसू काराजनगी यांच्या शुभहस्ते बसवमुर्ती पुजा करून जयंती साजरी करण्यात आली.






शरण संगमेश गिरमल्ला हिप्परगी यांनी बसव प्रार्थना सांगून म्हणाले,आज आपल्या देशाला व जगाला आलेल्या महारोग कोरोना पासून मुक्ती मिळावी हि बसवचरणी व लिंगदेव चरणी प्रार्थना करूया.लॉकडाऊन मुळे मोजक्या  लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टसिंग पाळत जयंती साजरी करण्यात आली.





कनाळ सर यांच्याहस्ते षटस्थळ बसव ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रीय बसव दलाच्या आवाहना नुसार  परिसरात घरोघरी बसव जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सुनिल शिवनूर,धरेप्पा कनमडी,गंगाराम चाभांर,महादेव संती आदी मान्यवर उपस्थित होते.



खोजानवाडी ता.जत येथे बसवजंयती साधेपणाने साजरी करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here