सांगली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी उत्पादन खर्च दुप्पट करायचं धोरण स्विकारलेले आहे. खताच्या किंमती दुप्पट करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.या दरवाढीच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 20 मे रोजी जिल्ह्यात स्वाभिमानीच्या वतीने खत पोती दहन आंदोलन करण्यात येणार आहे,अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे ,पोपट मोरे यांनी दिली.
खराडे म्हणाले,खताच्या किमती प्रचंड वाढविण्यात आल्या आहेत.डीएपी 1200 रुपयांना मिळायचे ते आता 1900 रुपयांना मिळायला लागले आहे.10:26:26 पूर्वी 1175 रुपयांना मिळत होते ते आता 1775 रुपयांना विकत घ्यावे लागत आहे.20:20:0 पूर्वी 975 रुपयात मिळत होते ते आता 1350 रुपयांना खरेदी करावे लागत आहे. युरियाचा किमतीतही 300 ते 400 रुपये वाढ झाली असून पोते 50 किलो एवजी 40 किलोचे करण्यात आले आहे.
एंकदरितच ही दर वाढ शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर काढणारी आहे.अव्वाच्या सव्वा दराने खत खरेदी करून शेती परवडत नाही शेती मालाचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत आणि खत,कीटक नाशक, मजूर,वीज बियाणे यांचे दर भरमसाठ वाढले आहेत या उलट शेती मालाचे भाव कमी होत आहेत, हे वास्तव आहे,पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्प्पन दुप्पट करतो अशी घोषणा केली होती मात्र ते उत्पादन दुप्पट करून शेतकऱ्यांना खड्ड्यात घालत आहेत.याच्याच निषेधार्थ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सर्वत्र,शेतात खत पोती दहन करून आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात पोपट मोरे,संदीप राजोबा, संजय बेले,भागवत जाधव अँड.सांदे आदीसह सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.







