गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांची येळवी शाळेस भेट

0

जत,संकेत टाइम्स : जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आर.डी.शिंदे, विस्ताराधिकारी तानाजी गवारे यांनी येळवी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळेची पाहणी करत रंगरंगोटी तसेच बोलक्या भिंती व चित्र रेखाटन हे सर्व त्यांनी पाहिले.शाळेचे भव्य स्वरूप पाहून अधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक भारत क्षीरसागरसह शिक्षक संजय कोळी,तात्यासाहेब चव्हाण यांचे कौंतुक केले.शाळेचा अंतरंग व बाह्यरंग,शाळा रंगरंगोटीसाठी ज्या ग्रामस्थांनी मदतीतून झाल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.





शाळेला लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्या माध्यमातून देता येते.सर्व शिक्षक व ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन शाळा एक डिजिटल शाळा,आदर्श मॉडेल स्कूल तयार करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी दिले.यावेळी तज्ञ मार्गदर्शक सुरेंद्रनाथ सरनाईक,बांधकाम विभागाचे इंजिनियर संजय सुतार उपस्थित होते.

Rate Card



गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांची  येळवी जि.प. शाळेस भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.