शेती विकासाचे “आदर्श मॉडेल ; श्री बनशंकरी नर्सरी अंतराळ(बनाळी)| “Ideal Model of Agricultural Development; Shri Banashankari Nursery Space (Banali)
शेगाव,संकेत टाइम्स : बनाळी (ता.जत) येथील श्री.काकासाहेब रावसाहेब सावंत यांनी त्यांच्या दोन्ही शिक्षक बंधू बापुसाहेब व आण्णासाहेब यांच्या सहकार्याने अंतराळच्या खडकाळ माळरानावर फुलवलेल्या केशर आंबा फळबागेचे व कोरडवाहू शेतीत केलेल्या विविध प्रकारच्या प्रयोगाचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.प्रंचड दुष्काळी परिस्थिती असतानाही तब्बल दहा किलोमीटर वरून पाईपलाईन द्वारे पाणी आणून सांवत बंन्धूनी
दुष्काळी भागातील नंदनवन फुलविले आहे.भविष्यातील कृषी पर्यटन स्थळ म्हणून बनशंकरी नर्सरी उदयास येत आहे.
जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शन व सहकार्यावर विश्वास दाखवून सावंत कुटुंबियांनी गेल्या आकरा वर्षांपासून प्रामाणिकपणे केलेल्या कठोर परिश्रमातून प्रतिकूल परिस्थितीतही पंधरा एकरात आंबा, डाळिंब, चिकू,पेरु,लिंबू, चिंच,सीताफळ,आवळा,जांभूळ यांच्या सह नारळ, काजू,फणस,सुपारी,अननस ही कोकणातील फळझाडे तसेच लवंग, दालचिनी, मिरी अशी मसाले पदार्थची झाडे जोपासली आहेत.सांवत यांच्या नर्सरीत सुमारे 7000 हुन अधिक फळझाडे आहेत.
ऐन ऊन्हाळ्यातही निसर्गाचा हा हिरवागार परिसर रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे आकर्षण ठरला आहे.शासकीय योजना यशस्वीपणे राबवत चांगले नियोजन करून उपलब्ध कमी पाण्याचा वापर ठिबकसिंचनाद्वारे केला जातो.कोरडवाहु फळझाडांची लागवड करताना कमी खर्च व शाश्वत उत्पादन मिळते याचा आदर्श सावंत यांनी दाखवून दिला आहे.
सावंत कुटुंबियांनी शेतीतील वेगवेगळे प्रयोग यशस्वी करुन दुष्काळातील शेतीला आंबा लागवडीतून वेगळी दिशा दिली आहे.
अनेक शेतकरी आंबा बागेला भेट देत असुन त्यांच्यासाठी 100 रुपये प्रति किलो प्रमाणे आवडेल तो आंबा देण्याची व्यवस्था सावंत यांनी केली आहे.बनशंकरी नर्सरी मध्ये आंबा,चिकू,पेरु,डाळिंब, लिंबू,चिंच, सीताफळ अँपलबोर,आवळा,जांभूळ ई.कलमे व नारळ,सुपारी,फणस, काजूची रोपे तसेच गुलाब, मोगरा, सोनचाफा, जास्वंद ही फुलांची झाडे आणि सायकस,मोरपंखी, ख्रिस्तमस ट्री,फायकस,क्रोटान,अरका पाम फाक्सटेल यासह विविध प्रकारची शो,कुंडीतील रोपे विक्रीसाठी उपलब्धं आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे.कठोर मेहनतीचे हे फळ असले तरी सावंत कुटुंबिय यशाचे श्रेय कृषी अधिकारी महोदयांना देतात “गुरुविणा कोण दाखविल वाट”या उक्तीप्रमाणे योग्य मार्गदर्शन असल्यानेच आम्ही यशस्वी झालो असे त्यांना वाटते.एकूणच बनाळी-अंतराळच्या फोंड्या माळरानावर दिमाखात बहरत चाललेली “बनशंकरी नर्सरी व केशर आंबा फार्म” ग्रामीण भागातील शेती विकासाचे “आदर्श मॉडेल ” म्हणून नावारूपाला येत आहे.हा फार्म परिसरातील शेतकऱ्यांना निश्चित पणे मार्गदर्शक ठरेल.
*सेंद्रिय खतांचा वापर करून व नैसर्गिकरित्या तयार झालेला
*एक्सपोर्ट क्लालिटी केशर आंबा
किरकोळ विक्री सुरु
*दर 100 रूपये प्रति.किलो
*मनपसंत आंब्याची निवड करून घेवू शकता
100 टक्के गँरेंटी & क्वालिटी
संपर्क:
बनशंकरी नर्सरी & केशर आंबा फार्म, अंतराळ(बनाळी)
8275391582/1/3
8308434783