40 व्हेटिलेंटर,200 ऑक्सीजन बेड उपलब्ध करा ; तम्मणगौडा रवीपाटील |मास्क,सँनिटायझर, पीपीई किटच्या पुढे चला

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला कोरोनाचा विळखा पडला आहे,अशा स्थितीत तालुक्याच्या आमदारांनी मास्क,सँनिटायझर, पीपीई किट पेक्षा सध्या तालुक्यातील रुग्णांना गरजेचे असणारे 40 व्हेंटीलेंटर, 200 ऑक्सीजन बेड तयार करावेत,असे आवाहन जिल्हा परिषद माजी सभापती तथा सदस्य तम्मणगौडा रवीपाटील यांनी केले आहे.
जत तालुक्याच्या आमदाराकडून कोरोना उपाय योजनासाठी एक कोटीचा आमदार फंड दिला आहे. त्यात कापडी मास्क,एन 95 मास्क,सॅनिटाईझर,पीपीई किट,फेसशिल्ड अशा साहित्यांची मागणी केली आहे.सध्या हे साहित्य मेडिकल सेंटरमध्ये उपलब्ध आहेत.ते खरेदी करण्या इतपत रुग्णांची क्षमता आहे.सध्या खरी गरज ऑक्सीजन बेड,व्हेटिंलेटची आहे.मात्र आमदार हे सोडून वेगळ्याच साहित्यांची मागणी करत आहेत. 
रवीपाटील म्हणाले,जत तालुक्यात कोरोनाचे दररोज दोनशेवर रुग्ण आढळून येत आहेत,तरीही तालुक्यात चार व्हेंटिलेटर आहेत.ऑक्सीजन बेड उपलब्ध नाहीत.सांगलीतील रुग्णालये जतपासून दिडशे किलोमीटर अंतरावर आहेत.तेथेही बेड,ऑक्सीजन,व्हेटीलेटर उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्ण घाबरून ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्त होत आहेत.त्यामुळे मुत्यू रोकण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.


Rate Card

रवीपाटील म्हणाले,आमदार कोरोनाच्या आढावा बैठका घेत आहेत. तेथे कोन उपस्थित असते हा महत्वाचा विषय आहे.माडग्याळ येथे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केले.मात्र तेथे सुविधा कितपत आहेत.हाही विषय आहे.तालुक्यातील जनतेला कोरोनातून वाचविण्यासाठी आमदारांनी त्यांचा फंड,शासन,जिल्हा नियोजन,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या माध्यमातून फंड‌ उपलब्ध करून तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान 40 व्हेंटिलेटर,200 ऑक्सीजन बेडची सोय करावी,मास्क,सँनिटायझर सारखी साहित्य आता गावापर्यत उपलब्ध झाले आहेत.त्यांची सोय होते,मात्र जीव वाचविण्यासाठी लागणारे व्हेटिलेंटर ऑक्सीजन बेड उपलब्ध करावेत.


रवीपाटील म्हणाले, तालुक्याचे आमदार असलेले सांवत हे कोरोना परिस्थिती हाताळण्यात पुर्णत: अपयशी ठरले आहेत.जिल्ह्यातील आमदार काय करतात,यांच्याकडे तरी आमदारांनी बघावे,सर्वात मोठ्या असणाऱ्या तालुक्यात कोरोना रोकण्यासाठी आमदारांनी झोकून देऊन काम करण्याची गरज असताना पत्रकार बैठका घेऊन उपलब्ध नसलेल्या सुविधा उपलब्ध केल्याच्या घोषणा करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव स्व:त करून आमदार काय साध्य करत आहेत.असा आरोप रवीपाटील यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.