जत तालुक्याला कोरोनाचा विळखा आणखीन वाढला,63 गावात तब्बल 286 रुग्ण | चौघाचे मुत्यू | जत शहरात कोरोनाचा विस्फोट

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा दुसऱ्या दिवशी विस्फोट सुरूच आहे.गुरूवारी तालुक्यात रुग्णाचा तब्बल पावणे तीनशेचा टप्पा पुर्ण करत संख्या 286 वर पोहचली आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण जत तालुक्यात आल्याने तालुकाच संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाला आहे.जत शहराला कोरोनाने विळखा घातल्याचे स्पष्ट झाले असून शहरात एकाच दिवशी 51 रुग्ण आढळून आले आहेत.


तालुक्यातील जत शहरासह 63 गावात गुरूवारी रुग्ण आढळून आले आहेत.चार रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे. तालुक्यात 149 रुग्ण गुरूवारी कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या तालुक्यातील 1487 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 1284 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.तेच कोरोना प्रसाराला कारण ठरत असून कंटेन्टमेंट झोन केल्या शिवाय कोरोनाचा तालुक्यातील प्रभाव कमी होणार नाही हे यावरून निश्चित झाले असतानाही प्रशासनाकडून याबाबत गांर्भिर्य घेतले जात नाही.आजार सोडून दुसरीकडेच उपचार करण्याच्या प्रकाराने कोरोना अनेक जीव घेणार हे ठळक झाले आहे.तालुक्यातील जत शहरासह शेगाव,कुंभारी,माडग्याळ, सनमडी,उंटवाडी,बिळूर,उमराणी,उमदी,उटगी,कुणीकोणूर,डफळापूर गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.

जनता कर्प्यू पोलीसांनी गंभीर पणे घेतल्याचे दिसत नाही.नागरिक,वाहने थेट पोलीसा समोरून जात असतानाही कारवाईला मर्यादा का ? असा प्रश्न आहे.दुसरीकडे जनता कर्प्यूत कडकडीत बंद पाळण्यात येत असताना दारू,मटका,जूगार बेधडक सुरू आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचा जावई शोध पोलीसांनी आर्थिक लाभामुळे लावल्याचे चित्र आहे. 


Rate Card

खरेतर गतवेळी प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांना कडक धोरण राबविण्याची गरज असतानाही होमगार्डवर,दुचाकी,वाहन धारक, नागरिकांना रोकण्याची जबाबदारी हे पोलीसांचे अपयश म्हणायचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुधवारचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण २८६ जत ५१ तिप्पेहळळी १ अचकनहळळी ४ अमृतवाडी २ पाच्छापूर ३. वळसंग ४ रामपूर २ शेडयाळ १ तिप्पेहळळी

१ काराजनगी १ घाटगेवाडी १ रामपूर २ शेगाव १४ कुंभारी ११ माडग्याळ १० सनमडी ७ उंटवाडी २७ बिळुर १३ उमराणी ११ उमदी १३ ऊटगी ८ सुसलाद ४ वाळेखिंडी ६ 


कोसारी १ हिवरे १ प्रतापपूर १ कोसारी ३ शिंगनहळळी १ अंतराळ १ धावडवाडी १ जा.बोबलाद ४ कोळेगिरी ३ कुणीकोणूर ६ सोन्याळ १ व्हसपेठ १ लकडेवाडी १ खैराव १

सिंदूर ३ वज्रवाड १ मेढेगिरी १ खोजानवाडी ३ येळदरी १ दरिकोणूर ५ खंडनाळ १मोटेवाडी ३ आसंगी जत १ पॉडोझरी १ गोंधळेवाडी २ तिल्याळ १ अंकलगी १ मुंचडी १ डफळापूर ६ कुडणुर १ बेळुखी ६ वाषाण १ एकोंडी १ खलाटी १ करेवाडी ६ आक्कळवाडी १ बोर्गी ४ को .बोबलाद ४ भिवर्गी १ जाल्याळ बु ४ देवनाळ २Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.