पोलीसाचे ढिसाळ नियोजन,जतेत नागरिक रस्त्यावर | दुकाने पाठीमागून उघडी

0
7



जत,संकेत टाइम्स : जत शहरात कोरोनाचा विस्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर जनता कर्प्यू  लावण्यात आला आहे.तरीही बेपर्वार्ह नागरिकांकडून कोरोना वाढीला आमंत्रण देण्यात येत आहे. शहरातील काही बेजबाबदार दुकानदारा कडूनही दुकाने उघडून माल देण्यात येत आहे.गुरूवारी अशा चार दुकानावर कारवाई करत नगरपरिषदेकडून दंड वसूल करण्यात आला आहे.





नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील रस्त्यावर उतरले आहेत. अशा बेजबाबदार दुकानदारावर कारवाई केली.अशा प्रकाराने जनता कर्प्यू फेल ठरण्याची शक्यता असून नागरिकांचा रस्त्यावर वावर कोरोनाचा संसर्ग वाढविणारा आहे.दरम्यान या प्रकाराला रोकण्यासाठी नेमलेले पोलीस कानडोळा करत असल्याचे चित्र असून शहरात सर्वत्र होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे.पोलीस कर्मचारी अपवादाने दिसत आहेत.




पोलीस अधिकारी, कर्मचारी फक्त गाडीतून फिरत असल्याने नागरिकांवर पोलीसाची दहशत तयार होत नाही.नेमके होमगार्ड नेमून पोलीस अधिकारी,कर्मचारी करतात तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.



जत शहरातील विजापूर-गुहाघर रस्त्यावर गुरूवारीची गर्दी खरचं जनता कर्प्यू आहे काय असा प्रश्न उपस्थित करत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here