जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तालुक्यातील जतसह 53 गावात तब्बल 248 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुकाच कोरोनाच्या विळख्यात आल्याचे समोर आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात जनता कर्प्यू लावण्यात आला आहे. तरीही रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे.
तालुक्यातीलजत,गुळवंची,शेगाव,
उमदी,माडग्याळ,
कुणीकोणूर,अंकलगीत कोरोनाने विळखा घातला असून जतेत 39,गुळवंची 32,तर इतर गावात दहापेक्षा जादा कोरोना बाधित आढळून आले आहेत.त्याशिवाय कुंभारी,गुगवाड,
जा.बोबलाद,गुड्डापूर,उमराणी,लमाणतांडा,गोंधळेवाडी येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.शहरातील रुग्णाचा संसर्ग तालुकाभर विस्तारला आहे.त्यामुळे घराबाहेर न पडणाराचं सुरक्षित असल्याची स्थिती बनली आहे.
जनता कर्प्यू पाळण्यात आल्यानंतरही काही बेपर्वार्ह नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे समोर येत आहे. त्याशिवाय अनेक दुकानदार पाठीमागील दरवाज्यातून माल देण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे.त्याशिवाय पोलीसांच्या हप्तेबाजीमुळे अनेक गावात दारू,मावा,गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे.जूगार,मटका,गावठी दारू कोरोना संसर्ग वाढवत आहे.
तालुक्यातील एकूण संख्या बुधवारी 4,995 झाली असून 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1354 रुग्ण तालुक्यात उपचाराखाली आहेत.त्यातील 1203 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.तेच धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले असून रुग्ण आलेल्या घराला 14 दिवसाच कंटेन्टमेंट झोनच कोरोचा संसर्ग रोकणे शक्य होणार आहे.
मंगळवारी तालुक्यातील एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.
जत 39, कुंभारी 5, बेवणूर 2 ,गुळवंची 32, शेगाव 11, धावडवाडी 1, संख 1, भिवर्गी 2, वळसंग 3, गुगवाड 7, कुणीकोणूर 12, सोन्याळ 3, जा.बोबलाद 6, उमदी 11,को .बोबलाद 3, लवंगा 1,मोरबगी 1, जाल्याळ 4 करेवाडी को 3, तिकोंडी 2, बिळुर 1, वायफळ 1, माडग्याळ 15, व्हसपेठ 3, सनमडी 1,काराजनगी 1,
गुडडापूर 6, उटगी 3, लकडेवाडी 1, ऊटंवाडी 1, मुचंडी 2, आक्कळवाडी 1,तिल्याळ 1, उमराणी 7, पाच्छापूर 1, दरिबडची 1, खोजानवाडी 1, सिंदुर 1, खैराव 2, लोहगाव 1,आसंगी जत 1, निगडी 4 बाज 1, वज्रवाड 1, रामपुर 3, बेवणूर 3, येळवी 2,कुलाळवाडी 3, टोणेवाडी 1, अंकलगी 12, खंडनाळ 1, लमाणतांडा 7, गोधळेवाडी 6,
पांडोझरी 3