15 पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गावात कठोर निर्बंध ; पालकमंत्री जयंत पाटील | जतेत घेतला कोरोना स्थितीचा आढावा

0जत,संकेत टाइम्स :  जत‌ तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.काही गावात दररोज 20 पेक्षा जादा बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची चेन तोडण्यासाठी यापुढे 15 पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गावात कडक निर्बंध घातले जातील,तेथील प्रशासनाने ते तालुका प्रशासनाच्या माध्यमातून काटेकोर आमलांत आणावेत,कोरोना संसर्ग वाढू नये अशा उपाय योजना राबवाव्यात,असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

जत तालुक्यात वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जतेत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी तालुक्यातील रुग्णसंख्या, उपलब्ध असलेले बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा साठा, लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. जत तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे.यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, डिवायएसपी रत्नाकर नवले, तहसीलदार सचिन पाटील,हणमंत म्हेत्रे, बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.Rate Card

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज करण्याचे तसेच माडग्याळ येथील हॉस्पिटल सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासनाने रुग्णांची तालुक्यातच व्यवस्था करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्याचा प्रयत्न करावा. 


ज्या गावात 15 पेक्षा अधिक रुग्ण असतील त्या गावात कठोर निर्बंध करावेत. आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांच्यावर दमदाटी करणाऱ्यां विरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याबाबत कठोर कारवाई करावी. तसेच तालुक्यातील लस उपलब्धीनुसार लसीकरण मोहीम राबवावी अशा सुचना पालकमंत्री यांनी यावेळी केल्या.जत येथील आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री जयंत पाटील, बाजूस आमदार विक्रमसिंह सांवत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.