डफळापूरात ब्रेक द चेन,पाच दिवस कडकडीत बंद
डफळापूर : डफळापूर येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून शनिवार पासून पाच दिवसाचा कडकडीत बंद पुकारला आहे.त्याला दुसऱ्यादिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शनिवार ते बुधवार पर्यत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ब्रेक द चैन ची कारवाई करण्यात आली आहे.
डफळापूर गत आठवड्यात कोरोना रुग्णाची वाढ झाली होती.
मात्र गेल्या चार दिवसापासून डफळापूर मध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.तरीही खबरदारी म्हणून संरपच बालिकाकाकी चव्हाण यांनी शुक्रवारी व्यापारी,पदाधिकारी यांची बैठक घेत पाच दिवसाचा बंद पुकारला आहे.गावातील अत्यावश्यक सेवा असणाऱ्या कृषी,दुध डेअऱ्या मेडिकल,दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.त्या किराणा,बेकरी,व अन्य अत्यावश्यक सेवेचीही दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
मेडिकल ही सकाळी 9 ते 3 वाजेपर्यत सुरू राहणार आहेत.दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डफळापूर ग्रामपंचायती कडून सर्व उपाय योजना सुरू आहेत.

नागरिकांनी गर्दी टाळावी,सोशल डिस्टसिंग, मास्क,सँनिटायझरचा वापर करावा,विना कारण गावात फिरू नये,आपल्याला कोरोना लढाईत एकसंघ लढायचे आहे.गतवेळी प्रमाणे दुसरी लाटही थोपवायची आहे, असे आवाहन बालिकाकाकी चव्हाण यांनी केले आहे.
डफळापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.त्यामुळे मुख्य बाजारपेठ निर्मनुष्य बनले आहेत.