जत,डफळापूरची चिंता होम आयसोलेशन रुग्णांनी वाढविली

0जत,संकेत टाइम्स : जत,डफळापूर मध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे.प्रांरभी अगदी रुग्ण संख्या मर्यादित असताना होम आयसोलेशन मधील पॉझिटिव्ह रुग्णाचा सार्वजनिक वावर संसर्ग वाढविणारा ठरला आहे.जत नगरपरिषद,व डफळापूर ग्रामपंचायती कडून अपेक्षीत कारवाई होत नसल्याने आरोग्य विभागावर ताण वाढला आहे.भल्या मोठ्या जत शहरात अनेक वेळा कोणता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे.हे कळतही नाही.पहिल्या लाटेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरासह लगतच्या ‌काही भागात कंटेनमेट झोन केला जायचा.त्याशिवाय पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांना आलगीकरण केले जायाचे मात्र दुसऱ्या लाटेत असे सर्व प्रकार बंद झाले.
Rate Cardपॉझिटिव्ह रुग्ण आला कि,काही औषधे देऊन होम आयसोलेशन मध्ये राहण्याच्या सुचना आरोग्य‌ विभागाकडून दिल्या जातात.मात्र तो पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन विलगीकरण मध्ये आहे,का? याकडे आरोग्य ‌विभागाचेही पुढे दुर्लक्ष होते.परिणामी असे काही पॉझिटिव्ह आलेले रुग्ण थेट सार्वजनिक ठिकाणी,आरोग्य केंद्रात येतात.त्यामुळे त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांसह इतरांनाही संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परिणामी अशा पॉझिटिव्ह रुग्णामुळे जत शहर,डफळापूर हायरिस्कवर पोहचले आहे.नव्या आदेशानुसार तहसीलदार यांनी कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या किमान घरांनातरी कटेंनमेंट झोन करावेत अशी मागणी होत आहे.डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयात असे तपासणी करण्यासह थेट उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे धोका अटळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.