जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला,मंगळवारी जत शहरासह तब्बल 44 गावात 164 नवे रुग्ण आढळून आले आहे.तर दोघाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
जत शहरात 29,तर डफळापूर, गुगवाड,बिळूर,सनमडी,बनाळी,अंकले,येळदरी येथे पाच पेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
नागरिकांचा हालगर्जीपणा कोराना वाढीला बळ देत असल्याचे समोर येत आहे.गेल्या चार दिवसात दररोज शंभरावर रुग्ण आढळून येत आहेत.
मंगळवारी तालुक्यात कोरोना रुग्णाचे दिड शतक पार केले.तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 3891 झाली असून सध्या 1049 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 885 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.
तालुक्यातील मुत्यूची संख्या 91वर पोहचली आहे. तर 25 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जत तालुक्यात आढळलेले नवे रुग्ण,जत शहर 29,माडग्याळ 4,कुणीकोणूर 2,जा.बोबलाद 1,सोर्डी 1,उटगी 4,मल्याळ 3,बागेवाडी 2,मेढेगिरी 2,बसर्गी 3,डफळापूर 8,पाच्छापूर 2,सोनलगी 1,गुगवाड 10,बिळूर 8,साळमळगेवाडी 1,
अमृत्तवाडी 1,कुणीकोणूर 2,येळवी 4,शेगाव 10,कासलिंगवाडी 1,कुंभारी 4,धावडवाडी 3,बेवनूर 2,प्रतापपूर 2,वज्रवाड 1,खोजानवाडी 3,सनमडी 8,कुळालवाडी 1,वायफळ 1,तिकोंडी 2,एंकुडी 2,खलाटी 1,अंकलगी 1,दरिबडची 2,संख 1,
दरिकोणूर 1,देवनाळ 2,जाल्याळ 1,वळसंग 2,बालगाव 4,उमदी 1,येळदरी 5,बनाळी 5,अंकले 6,मंगळवेढा 2,कवटेमहांकाळ 1असे एकूण 163 रुग्ण आढळून आले आहेत.