उमदी,बेंळूखीत इमारतीचे मोठे नुकसान | गोधळेवाडी,जाड्डरबोबलाद,लकडेवाडी जनावरे दगावली

0उमदी,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी झालेल्या मेघगर्जनेसह आलेल्या वादळी पावसात वीज पडल्याने गोंधळेवाडी,जाड्डरबोबलाद,

लकडेवाडी येथे विज पडून तीन जनावरे दगावली आहेत.तर उमदी येथे घरावर विज पडून घराचे,तर बेंळूखी येेथे हायस्कूलची इमारात कोसळून नुकसान झाले आहेत.तालुक्यातील उमदी येथील वसाप्पा सा ता प्रा कनगोंड यांच्या घरावर वीज कोसळली यात 80 हजाराचे नुकसान झाले.जाडरबोबलाद येथील शेतकरी परशुराम शिवाप्पा ऐनापूर यांच्या गोठ्या विज पडली,त्या गाईचा मुत्यू झाला,70 हजाराचे नुकसान झाले,

गोधळेवाडी यलम्मा मायाप्पा पांढरे यांची म्हैस दगावली,त्यात सत्तर हजाराचे नुकसान झाले,

Rate Card


लकडेवाडी शिवाजी सुखदेव लकडे यांची गाईच्या अंगावर विज पडल्याने गाईचा मुत्यू होऊन 65 लाखाचे नुकसान झाले.

दरम्यान,पश्चिम भागातील बेंळूखी येथील वादळी वाऱ्याने न्यू इंग्लिश स्कूलची इमारत कोसळून पाच लाखाचे नुकसान झाले.याशिवाय अनेक गावात अशा घटना घडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे घटना घडल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.