जत तालुक्यात रविवारी 133 रुग्ण | जत शहर,माडग्याळ,शेगाव,कुणीकोणूर, खोजानवाडी,शेड्याळमध्ये रुग्ण वाढले

0
0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रविवारी नव्या रुग्ण संख्येत वाढ झाली असून तालुक्यातील जत शहरासह 31 गावात एकूण 133 नवे रुग्ण आढळून आले आहेत.जत शहराची चिंता मात्र पुन्हा वाढली असून तब्बल 28 नवे रुग्ण आढळून आले आहेत.





त्याशिवाय प्रतापपूर,माडग्याळ,बेवनूर,

कुणीकोणूर,शेगाव,उमराणी,शेड्याळ येथे 5 पेक्षा जादा रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 3634 झाली आहे.तालुक्यात सध्या 875 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 710 रुग्ण होम आयसोलेशन आहेत.





तालुक्यात रविवारी 27 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

जत शहर 28,उटगी 1,माडग्याळ 6,वळसंग 1, मोरबगी 1,निगडी बु.3,उमदी 1, प्रतापपूर 1,बेवनूर 2,सिंगनहळ्ळी 4,पाच्छापूर 1,बिळूर 3,गुगवाड 1,सिंदूर 1,येळवी 1,राजोबावाडी 1,जा.बोबलाद 3,सनमडी 1,






कुणीकोणूर 7,उंटवाडी 1,घोलेश्वर 1,शेगाव 8,गुळवंची 2,आंवढी 1,बनाळी 1,रामपूर 4,जाल्याळ खु. 1,कुंभारी 2,खोजानवाडी 9,उमराणी 5,बिरनाळ 1,शेड्याळ 7,शिंगणापूर 1,चडचण 1,पंढरपूर 1,अथणी 1,सोलापूर 1,सांगोला 4,मंगळवेढा 10, असे एकूण 133 रुग्ण आढळून आले आहेत.







जत शहराची स्थिती दिवसन् दिवस बिकट होत असून आतापर्यत बाधित रुग्णाचा आकडा दोनशेवर गेला आहे.त्यामुळे चिंता वाढली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here